लडाख सीमेवरील चौकीवर आता महिला डॉक्टर

पीटीआय
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

भारत-चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) सध्या तणाव असताना भारतीय तिबेट सीमा पोलिस दलाने ऐतिहासिक निर्णय घेत लडाखच्या आघाडीवरील चौकीवर महिला डॉक्टरच्या पथकाची नियुक्ती केली.

नवी दिल्ली: भारत-चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) सध्या तणाव असताना भारतीय तिबेट सीमा पोलिस दलाने ऐतिहासिक निर्णय घेत लडाखच्या आघाडीवरील चौकीवर महिला डॉक्टरच्या पथकाची नियुक्ती केली. या निर्णयातून  आयटीबीपीने आपल्या सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले  आहे. विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. कात्यायनी शर्मा यांच्याकडे वैद्यकीय पथकाची जबाबदारी आहे.

आयटीबीपीने आपल्या प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) त बदल केला आहे. त्यानुसार आता भारत-तिबेट सीमा पोलिस दलाने काही आठवड्यापूर्वीच महिला डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पूर्वी भारत-चीनच्या प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील आघाडीच्या चौक्यांवर  जवानांच्या तपासणीसाठी पुरुष डॉक्टरांना पाठवले जात असे. परंतु आता पॅरामेडिकलसमवेतच आरोग्याची तपासणीसाठी महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. याशिवाय अन्या आरोग्य कर्मचारी देखील तेथे नेमण्यात आले आहेत. लेह येथील लष्करी तळावर देशभरातून जवान दाखल होतात आणि त्यांना रुजू होण्यापूर्वी कठोरपणे आरोग्य चाचणीला सामोरे जावे लागते. 
 

संबंधित बातम्या