चीनच्या मनात नेमके आहे तरी काय? ड्रॅगनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती सुरूच   

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

पूर्वेकडील लडाखजवळ भारत आणि चीन यांच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी आज सांगितले आहे.

पूर्वेकडील लडाखजवळ भारत आणि चीन यांच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी आज सांगितले आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एच क्यू आणि एच क्यू 22 या क्षेपणास्त्रांच्या तैनाती सुरूच ठेवली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. एच क्यू -9 ही रशियन एस -300 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची रिव्हर्स इंजिनियर्ड आवृत्ती आहे आणि सुमारे 250 कि.मी.च्या रेंजवर लक्ष्य गाठू शकते. (India closely watching Chinese air defence batteries deployed near LAC)

''इव्हेंटबाजी कमी करा, देशाला लस द्या''

भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी चीनने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर क्षेपणास्त्रांवर बारीक नजर ठेवून असल्याचे आज नमूद केले. याशिवाय चीनच्या बाजूकडील होटन आणि काश्गर एअरफील्ड्समधील लढाऊ विमानांची संख्या कमी झाली आहे, परंतु वेळोवेळी ही संख्या बदलत असल्याचे या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले. तर दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सरोवराच्या प्रदेशामधून सैन्य मागे घेण्यात आले असले तरी दोन्ही बाजूंनी अन्य भागात सैन्य तैनात करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

याव्यतिरिक्त, भारत (India) आणि चीन (China) या दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या सैन्य चर्चेत गोग्रा हाइट्स, हॉट स्प्रिंग्ज, देपसंग आणि डेमचोक जवळील सीएनएन जंक्शन याठिकाणाहून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार नसल्याचे समजते. त्यानंतर चीनने संघर्ष स्थळांवरून सैन्य मागे घेतल्यास आपली सेना मागे घेण्याचा विचार करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षापासून भारतीय व चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर सीमेवर तैनात आहे.

"नंदीग्राम मध्ये लोकांनी दीदींना क्लीन बोल्ड केलं"

त्यानंतर, भारताने शुगर क्षेत्र मध्य विभाग आणि ईशान्य सीमांमध्ये सैन्याची रचना आणि सैन्याच्या तैनाती मजबूत केली आहे. तर दोन्ही देशांमध्ये झालेल्या सैन्यातील कोर कमांडर बैठकीच्या नवव्या फेरीत पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर भागातून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती. आणि त्यानुसार या भागातून दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतले होते. त्यानंतर उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यासंदर्भात अजूनही चर्चा सुरु असून शनिवारीच अकरावी बैठक पार पडली होती. 

दरम्यान, मागील वर्षाच्या मे महिन्यात भारत आणि चीन यांच्यात लडाख भागात सीमावाद उफाळला होता. त्यानंतर जून महिन्याच्या मध्यात दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येत मोठा संघर्ष झाला होता. यात भारतीय सैन्यातील वीस जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. तर चीनच्या सैन्याची देखील मोठी हानी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य सीमारेषेवर आणून ठेवले होते. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगलेच तणावपूर्ण बनले होते. 

संबंधित बातम्या