India: Coronavirus affect on mental health; Increase in suicide incidence
India: Coronavirus affect on mental health; Increase in suicide incidence

कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम;  आत्महत्येच्या घटनांत वाढ

नवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाउनमध्ये गेले काही महिने घरात राहिल्यानंतर आता बाहेरच्या बदललेल्या जगाशी जुळवून घेणे हजारो लोकांना कठीण वाटत आहे. यामुळे भारतात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

मानसिक ताणातून नैराश्‍येपासून अगदी आत्महत्येचे टोकही गाठले जात आहे. 

आर्थिक समस्या आणि ताणतणावाला सामोरे जात असतानाच कोरोनामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे अनेक जणांना काळजीने घेरले आहे. सुरुवातीला सौम्य दिसणारी ही लक्षणे पुढे अति तीव्रही होत जातात. या टप्प्यात स्वतःला इजा करून घेण्याचे प्रमाण वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञ, दिल्लीतील अशोका सेंटरचे संचालक अरविंदर सिंग यांनी सांगितले.

चार महिन्यांत ९० आत्महत्या
गुजरातमध्ये १०८ आप्तकालिन रुग्णवाहिका सेवेकडे लॉकडाउनच्या काळात एप्रिल ते जुलै या काळात स्वतःला जखमी केल्याच्या ८०० तर आत्महत्येच्या ९० घटनांची नोंद झाली. दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशासह बहुतेक राज्यांमध्ये अशा घटना घडत आहेत. यासाठी मानसिक तणावाखाली असलेल्या रुग्णांना कसे हाताळायचे, त्यांच्यावरील उपचाराचे प्रशिक्षणही विविध संस्थामध्ये देण्यात येत आहे. 

नैराश्‍याची कारणे...

  • कोरोना संसर्ग होण्याची भीती
  • ताप, खोकला झाल्यास काळजी वाढणे
  • आर्थिक चणचण, नोकरी जाणे, कर्जाचे हप्ते भरणे
  • भविष्यातील अनिश्‍चितता
  • शिक्षण, विवाह

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com