भारत विजयी होतोच - मोदी

मंगेश वैशंपायन
शुक्रवार, 10 जुलै 2020

भारत व इंग्लंडदरम्यान इंडिया ग्लोबल वीक ही परिषद पुढचे तीन दिवस चालेल. विदेशमंत्री एस जयशंकर, वाणिज्य व रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुलकी विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आदी सहभागी होतील. इंग्लंडचे प्रिन्स चार्लस्‌ यांच्यासह विदेशमंत्री डॉमनिक रॉब, गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री लिझ टूस आदी सहभागी होतील.

नवी दिल्ली

भारतासमोर कितीही कठीण आव्हाने उभी राहिली तरी तो त्यावर मात करून विजयी होतोच, हा इतिहास आहे. कोरोना संकटकाळातही या वैश्‍विक महामारीशी लढा देतानाच दुसरीकडे अर्थव्यवस्था सावरणे या दोन्ही आव्हानांवर लक्षणीयरीत्या यश मिळविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतात गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे या, असे आव्हान त्यांनी जागतिक उद्योगसमूहाला केले.
आजपासून सुरू झालेल्या इंडिया ग्लोबल वीक 2020 चे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की कोवीड-19 च्या संकटकाळात साऱ्या जगाला "नमस्ते' चे महत्व समजले. भारत हा प्रतिभांचे व भारताचे औषधनिर्माण क्षेत्र हे जागतिक उर्जाकेंद्र आहे.
भारत व इंग्लंडदरम्यान इंडिया ग्लोबल वीक ही परिषद पुढचे तीन दिवस चालेल. विदेशमंत्री एस जयशंकर, वाणिज्य व रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुलकी विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आदी सहभागी होतील. इंग्लंडचे प्रिन्स चार्लस्‌ यांच्यासह विदेशमंत्री डॉमनिक रॉब, गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री लिझ टूस आदी सहभागी होतील.
पंतप्रधान म्हणाले की भारतातच देशाला "माता म्हटले जाते. इतिहास साक्षीदार आहे की आम्ही साऱ्या जगाला विकास व चांगलेपणाचे योगदान दिले व यापुढेही आम्ही ते देऊ इच्छितो. या संकटाने जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थांसमोर मोठे संकट आहे. आम्ही उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीसाठी (ईझ ऑफ डुईंग बिझिनेस) प्रयत्नशील आहोत. महामारीच्या काळात भारत सरकारने लोकांना सुविधा दिल्या व आर्थिक पॅकेजही लागू केले. सरकारी तिजोरीतील एक एक पैसा गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे हे ध्येय साध्य करणे तंत्रज्ञानामुळे सुलभ झाले. आम्ही लाखो लोकाना या महामारीतही मदत देत असल्याने ग्रामीण भागाला मोठी मदत मिळत आहे.
भारतात कृषी, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या अपार संधी आहेत. संरक्षण व अंतरिक्ष तंत्रज्ञान 7ेत्रातही सुधारणावादी पावलांमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. औषधनिर्माण क्षेत्रात स्वस्त व गुणवत्तापूर्ण, प्रभावी औषधांसाठी भारत ओळखला जातो असे सांगताना मोदी म्हणाले की महामारीच्या काळात साऱ्या जगाने पाहिले की भारताचे औषधनिर्माण क्षेत्र किती उत्तम काम करू शकते. आता कोरोना लसीच्या बाबतीतही हेच जगाला दिसेल असा विश्‍वास व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की भारत आता जगात विकास व समृध्दीचे मापदंड निश्‍चित करत आहे.

अमेरिकेच्या दुप्पट लोकसंख्येचे भरण-पोषण
कोरोना काळात केंद्र सरकारतर्फे राहविण्यात येणाऱ्या व दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिलेल्या पंतप्रधान अन्न योजनेचा लाभ 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळत आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तब्बल दुप्पट आहे हे लक्षात घेतले तर या योजनांची व्याप्ती व महत्व लक्षात येईल असे मोदी यांनी सांगितले. आज सकाळी आपल्या वाराणसी मतदारसंघातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतीनिधींना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की कोरोनामुळे भारतातील परिस्थिती बिघडेल असे अनेक तज्ञ सांगत होते. पण लोकांच्या सहकार्य व सहभागितेने त्यांच्या शंका उध्वस्त झाल्या आहेत. 24 कोटी लोकसंख्येचा उत्तर प्रदेश हे ब्राझील देशाइतकेच मोठे राज्य आहे. त्या देशात मृतांची संख्या 65 हजार वर गेली असताना उत्तर प्रदेशात हा आकडा 800 वर आहे. याचा अर्थ लोकांनी सहयोग दिल्याने राज्य सरकारने अनेकांचे जीव वाचविल्याचे सिध्द झाले आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या