तालिबानचं सरकार भारत स्वीकारत नाही: परराष्ट्र मंत्री जयशंकर
S. JaishankarDainik Gomantak

तालिबानचं सरकार भारत स्वीकारत नाही: परराष्ट्र मंत्री जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केले की, आम्ही तालिबानच्या नवीन सरकारला व्यवस्थेपेक्षा (Dispensation) काहीही मानत नाहीत.

भारताने अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान सरकारला मान्यता देण्यास नकार दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केले की, आम्ही तालिबानच्या नवीन सरकारला व्यवस्थेपेक्षा (Dispensation) जास्त काही मानत नाही. जयशंकर यांनी तालिबान सरकारमध्ये (Taliban government) अफगाणिस्तानमधील सर्व घटकांचा सहभाग नाही.

शनिवारी ऑस्ट्रेलियासोबत दोन-प्लस-टू बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीय बाजूने बैठकीला हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाच्या वतीने परराष्ट्र मंत्री मेरी पायने आणि संरक्षण मंत्री पीटर डटन देखील उपस्थित होते.

S. Jaishankar
तालिबान सरकारचा आज होणारा शपथविधी रद्द

चीनला चोख प्रत्युत्तर

चीनने क्वाड देशांना आशियाई नाटो म्हणून संबोधल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले - क्वाड (भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान) देशांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. आम्ही कोरोना महामारी विरुद्ध लसीकरण, पुरवठा साखळी आणि शिक्षणावर भर देतो. त्यामुळे क्वाड गटास एशियन नाटो म्हणणे हा गैरसमज आहे, कारण नाटो ही शीतयुद्धाची संज्ञा आहे. ते पुढे म्हणाले की, ही पूर्णपणे राजनयिक-युती आहे.

दहशत पसरवण्यासाठी अफगाणिस्तानची भूमी वापरु नये

बैठकीत दोन्ही देशांनी एकसंधपणे सांगितले की, अफगाणिस्तानची भूमी जगात दहशत पसरवण्यासाठी वापरण्यात येऊ नये. या संदर्भात भारताने संयुक्त राष्ट्रांच्या 2593 विधेयकाची अंमलबजावणी करण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आहे. या विधेयकानुसार, जगातील कोणत्याही देशाला दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापासून रोखण्यावर भर देण्यात आला आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, ऑस्ट्रेलियासोबतच्या टू प्लस टू बैठकीत अफगाणिस्तानमधील व्यवस्थेचे एकत्रीकरण आणि महिला आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर चर्चा झाली आहे.

S. Jaishankar
All Party Meeting: अफगाणिस्तान मुद्यावर सर्व पक्षांची सहमती; एस. जयशंकर म्हणाले...

दोन्ही देशांनी चीनवर साधला निशाणा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनीही चीनवर जोरदार निशाणा साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 2+2 संवाद भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकूण सामरिक भागीदारीचे प्रतिबिंब आहे. दोन्ही देशांमधील संबंध एक मुक्त, खुले, एकात्मिक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी असेही म्हटले आहे की, दोन्ही देशांनी मुक्त व्यापार सुनिश्चित करणे, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे आणि शाश्वत आर्थिक वाढ सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

दहशतवादाविरोधातील लढाईत कोणतीही तडजोड नाही

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याला आज 20 वी वर्धापन दिन आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत आपण तडजोड करू नये याची आठवण हा हल्ला करुन देतो. दहशतवादाचा केंद्रबिंदू आपल्या जवळ असल्याने भारत हे करु शकत नाही. मेरी पेनने असेही म्हटले की, आमचा मित्र देश अमेरिकेवर 9//11 चा हल्ला कधीही विसरू शकत नाही.

S. Jaishankar
विदेश मंत्री एस जयशंकर यांचा केजरीवालांवर निषाणा, बेजबाबदार वक्तव्याने होऊ शकतो द्विपक्षीय संबंधावर परिणाम

दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मेरी पायने यांनीही अफगाणिस्तानमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली. अफगाणिस्तानमधील मानवतावादी मदतीबाबत त्यांनी टू प्लस टू बैठकीत भारताशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी संध्याकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय, सुरक्षा, व्यापार आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com