अमेरिकन नौदलाच्या युद्ध सरावानंतर भारत आणि अमेरिका आमने-सामने

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

अमेरिकेच्या नौदलाच्या सातव्या फ्लीटने भारताच्या हद्दीतील लक्षद्वीपमध्ये परवानगीशिवाय ऑपरेशन चालविण्याच्या बाबतीत अमेरिकेला आपली चिंता कळवली असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या नौदलाच्या सातव्या फ्लीटने भारताच्या हद्दीतील लक्षद्वीपमध्ये परवानगीशिवाय ऑपरेशन चालविण्याच्या बाबतीत अमेरिकेला आपली चिंता कळवली असल्याचे म्हटले आहे. संमतीशिवाय याप्रकारचा युद्ध सराव करणे हे भारताच्या सागरी सुरक्षा धोरणाचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात संयुक्त राष्ट्रसंघाच्या युन कन्व्हेंशन मध्ये भारत सरकारने आपले स्थान स्पष्ट केले आहे की, परवानगीशिवाय विशेष इकॉनॉमिकल झोन मध्ये प्रवेश करून कोणत्याही देशाला सैन्य सराव करण्याचा अधिकार नाही. आणि विशेषत: ज्यात स्फोटके आणि शस्त्रे वापरली जातात त्यांना अधिकार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (India expressed concern to US over US naval war practice) 

यापूर्वी, अमेरिकेच्या सातव्या फ्लीटच्या पब्लिक अफेयर्सने दिलेल्या निवेदनात, 7 एप्रिल 2021 रोजी अमेरिकन युद्धनौका जॉन पॉलने लक्षद्वीपच्या पश्चिमेस 130 नॉटिकल मैलांच्या पश्चिमेकडील भारताच्या विशेष क्षेत्रामध्ये नेव्हिगेशनल हक्क आणि स्वातंत्र्याचा वापर केला असल्याचे म्हटले होते. याशिवाय, त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार भारताकडून कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचे पुढे या निवेदनात म्हटले होते. इतकेच नाही तर, भारताच्या म्हणण्यानुसार लष्करी सराव आणि विशेष इकॉनॉमिकल झोन मधील हालचालींसाठी पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे, परंतु ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचे अनुपालन नसल्याचे अमेरिकेच्या सातव्या फ्लीटच्या पब्लिक अफेयर्सने निवेदनात नमूद केले होते.  

''राहुल गांधी पार्ट टाइम राजकारण आणि परदेशी कंपन्यांसाठी फुल टाइम...

याशिवाय, अमेरिकेने नौदलाने (US Navy) नियमित आणि फ्रिडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन्सचे संचालन करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भूतकाळात याचे संचालन केले असून भविष्यातही करत राहू, असे अमेरिकेने म्हटले होते. तसेच, एफओएनओपी कोणत्याही एका देशाबद्दल नसतो आणि त्यांचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे अमेरिकेच्या नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले होते.     

दरम्यान, अमेरिकेच्या (America) नौदलाच्या सातव्या फ्लीटच्या या विधानामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध काहीसे ताणले जाण्याची शक्यता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अमेरिका सध्या भारताचा सर्वात जवळचा रणनीतिक भागीदार आहे आणि दोन्ही बाजूंचा विस्तार चीनच्या समुद्री भागात, विशेषत: दक्षिण चीन समुद्रात होत आहे. शिवाय भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नौदल हे संपूर्ण वर्षभर युद्ध सराव करत असतात. 

संबंधित बातम्या