भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 39.6%

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 39.6%
भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 39.6%

मुंबई,

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी, कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने, राज्ये आणि केंद्र्शासित प्रदेशांसह श्रेणीबद्ध, तत्पर दृष्टीकोन स्वीकारत अनेक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. यांचा उच्च स्तरावर नियमित आढावा घेतला जात असून त्यावर लक्ष ठेवले जात आहे.

कोविड-19 ची गती संथ राखण्यात भारत तुलनेत सक्षम राहिला असून कोविड-19 शी संबंधित आकडेवारीवरून त्याचा प्रभाव आपल्याला पाहता येईल.

जागतिक आकडेवारीशी तुलना करता एक लाख लोकसंख्येमध्ये 62.3 रुग्ण आढळतात तर भारतात हे प्रमाण एक लाख लोकसंख्येत केवळ 7.9 रुग्ण इतके आहे. त्याच प्रमाणे एक लाख लोकसंख्येत जागतिक स्तरावर सरासरी मृत्यू दर 4.2 आहे तर भारत हे प्रमाण 0.2 आहे.

रुग्णांची वेळेवर दखल आणि वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे तुलनेत मृत्यू दर कमी राहिला आहे. वैद्यकीय व्यवस्थापन आणि रुग्ण बरे करण्यावर भर राहिल्यामुळे, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. 39.6 % पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले  असून आता पर्यंत एकूण 42,298 रुग्ण यातून बरे झाले आहेत.  हा रोग बरा होणारा असून भारतात अमलात आणली जाणारी  वैद्यकीय व्यवस्थापन पद्धती प्रभावी असल्याचे हे द्योतक आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची माहिती पाहता, व्यवस्थापनाखाली असलेल्या सक्रीय रुग्णांपैकी 2.9 % रुग्णांना ऑक्सिजन सहाय्याची आवश्यकताआहे, 3 % सक्रीय रुग्णांना आयसीयू सहाय्याची तर 0.45 % सक्रीय रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे. कोविड समर्पित आरोग्य पायाभूत संरचना सुधारण्यावर भारत त्याचवेळी लक्ष केंद्रित करत आहे.

कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताज्या माहितीसाठी  तसेच तांत्रिक आणि काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया: https://www.mohfw.gov.in/. आणि  @MoHFW_INDIA ला भेट द्या.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास : technicalquery.covid19@gov.in या ई मेल आय डी वर  आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva वर पाठवाव्यात.

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (निशुल्क) वर संपर्क करावा.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com