'भारत गृहयुद्धाकडे जातोय': लालू यादव यांचा भाजपवर चौफेर हल्ला

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव (Lalu Yadav) यांनी रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवला.
 Lalu Yadav
Lalu YadavDainik Gomantak

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांनी रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवला. लालू यादव म्हणाले की, 'देश गृहयुद्धाकडे जात आहे.' लालूंनी जनतेला महागाई आणि बेरोजगारीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. (India heading towards civil war unite against inflation and unemployment Lalu Yadav attacks on bjp)

लालू यादव म्हणाले, "भाजप (BJP) ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे देश गृहयुद्धाकडे जात आहे. मी जनतेला देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) एकजूट होण्याचे आवाहन करतो. आम्हाला एकजुटीने लढायचे आहे आणि विशेष म्हणजे यात जिंकायचे सुध्दा आहे" इतकेच नाही तर लालू यादव यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकजुटीने लढण्याचे आवाहनही केले. "आम्हाला मागे हटण्याची गरज नाही," असेही ते म्हणाले. लालू यादव यांनी संपूर्ण क्रांती दिनात केलेल्या भाषणात हे वक्तव्य केले.

 Lalu Yadav
लालू प्रसाद यादव यांच्या 17 ठिकाणांवर CBIचे छापे, भ्रष्टाचाराचा नवा गुन्हा दाखल

दरम्यान, लालू यादव यांना एप्रिलमध्ये झारखंड (Jharkhand) उच्च न्यायालयाने चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय जनता दल ( RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव काही आठवड्यांपूर्वीच बिहारमध्ये परतले होते. त्यांची मोठी मुलगी मीसा भारतीसोबत ते पाटणा येथे पोहोचले. चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात जामिनावर सुटल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी मिसा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्काम ठोकला होता.

 Lalu Yadav
लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन

तसेच, 31 मे रोजी पाटण्यात आल्यानंतर लालूंनी पक्षाच्या नेत्यांची बैठकही घेतली. या भेटीनंतर लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी ट्विट करत म्हटले होते की, ''आज विधिमंडळ पक्षाची बैठक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत एक कोटी लोकांना राजदचे सदस्य बनवणे, जातनिहाय जनगणना, महागाई आणि बेरोजगारी या विषयांचा अजेंड्यात समावेश करण्यात आला. या मुद्द्यांवर आंदोलन कसे तीव्र करता येईल यावरही चर्चा झाली.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com