Coronavirus: भारतने केली टोसिलिजुमैब औषधाजी आयात; महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक डोस 

Medicine
Medicine

कोरोनाच्या साथीवर लढा देण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. केंद्र सरकारने कोरोनामध्ये कामी येणारे टोसिलिजुमैब(Tocilizumab) औषध आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात या औषधाचे मार्केटिंग आणि वितरण करण्याचे अधिकार सिपला कंपनीला दिले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना या औषधाचे वितरण केले आहे. त्याचबरोबर, राज्य सरकार सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना वितरित करील. (India imports Tosilizumab medicine; The highest dose for Maharashtra)
   
कोरोनावरती प्रभावी ठरणाऱ्या औषधाचे 800 डोस महाराष्ट्राला (Maharashtra) वाटण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये  24 तासात 66,358 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच 895 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा सर्वात जास्त आकडा आहे. मागच्या काही दिवसांपासून भारतात 3 लाखांच्यावरती रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर, बरे होणाऱ्या रुग्णाची संख्याही वाढत आहेत. 

दिल्लीला (Delhi) या औषधाचे 500 डोस दिले आहेत, तसेच गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश, पंजाब-चंदीगड, केंद्रशासित प्रदेश यांना प्रत्येकी 200-200 डोस दिले गेले आहेत. हरियाणा, तेलंगणाला प्रत्येकी 160 डोस दिले आहेत. उत्तर प्रदेशला 150 तसेच कर्नाटक राजस्थान यांना 100-100 डोस दिले आहेत. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, केरळ या राज्यांना प्रत्येकी 50 डोस दिले अहेत. झारखंड, ओडिशा, उत्तराखंड या राज्यांना प्रत्येकी 25 डोस दिलेले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की हे औषध विचार करून वापर.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com