Corona Vaccination : कोरोना लसीकरण मोहिमेत भारताची गरुड झेप 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

देशातील कोरोना लसीकरण मोहीम हळहळू चांगलाच वेग पकडत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईतील अंतिम पाऊल वेग पकडत असून, लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

देशातील कोरोना लसीकरण मोहीम हळहळू चांगलाच वेग पकडत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईतील अंतिम पाऊल वेग पकडत असून, लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. कोरोना विरुद्ध जलद लसीकरणाच्या बाबतीत आता फक्त अमेरिकाच भारतापेक्षा पुढे आहे. गेल्या 34 दिवसांत देशातील एक कोटी जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. अमेरिकेला कोरोना विरुद्धची लस एक कोटी जणांना देण्यासाठी 31 दिवस घेतले होते. तर तेच ब्रिटनला यासाठी 56 दिवस लागले होते. 

जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम देशात 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 2,11,462 सत्रात 1,01,88,007 आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाच्या लढाईतील आघाडीच्या सेवकांना लस देण्यात आली आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांमधील 62,60,242 जणांना लसीचा पहिला डोस आणि 6,10,899 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, कोरोनाच्या लढाईतील अग्रेसर असलेल्या 33,16,866 सेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांना 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर, 13 फेब्रुवारीपासून दुसरा डोस देण्यास सुरवात करण्यात आली. 

Farmers Protest Toolkit Case : दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

देशात कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या सेवकांना 2 फेब्रुवारीपासून लस देण्यास सुरवात करण्यात आली. लसीकरण मोहिमेच्या 34 व्या दिवशी एकूण 6,58,674 जणांना लसीकरण करण्यात आले. यातील 4,16,942 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि 2,41,732 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 34 व्या दिवशी 10,812 सत्रांमध्ये लसीकरण करण्यात आले. याशिवाय, आठ राज्यांमध्ये 57.47 टक्के लसीकरण झाले आहे. उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य आहे जेथे सर्वाधिक 10.5 टक्के लसीकरण केले गेले आहे. 

याव्यतिरिक्त, सात राज्यात 60.85 टक्के लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आणि तेलंगणा मध्ये 12 टक्के लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 16 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, झारखंड, मेघालय, पुद्दुचेरी, चंडीगड, मणिपूर, मिझोरम, लक्षद्वीप, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, लडाख, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, दमण दीव आणि दादर नगर हवेली या राज्यांमध्ये मागील 24 तासांत कोरोनाच्या संसर्गामुळे एकालाही आपला जीव गमवावा लागलेला नाही.   

संबंधित बातम्या