भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची लवकरच भेट?

indo pakistan.jpg
indo pakistan.jpg

नवी दिल्ली : भारत- पाकिस्तान (India-Pakistan) या दोन्ही शेजारी देशांनी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार महन्यांनी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) अजित दोभाल (Ajit Doval) आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसुफ (Moid Yusuf) यांची येत्या आठवड्यात दुशान्बे (Dushanbe) येथे भेट होणार आहे. 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organization) परिषदेसाठी ताजिकिस्तानच्या (Tajikistan) राजधानीमध्ये अजित दोभाल आणि युसुफ सहभागी होणार आहेत. 23- 24 जून रोजी दोभाल स्वत: हजर राहणार आहेत. या परिषदेला रशियाचे एनएसए निकोलाय पॅट्शेव्ह (Nikolai Patshev) अफगाणिस्तानचे एनएसए हमदुल्लाह मोहिब आणि चीन, कझाकिस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे एनएसएही हजर राहणार आहेत. (India Pakistan National Security Adviser to meet soon)
Social Media Misuse: संसदीय समिती समोर ट्विटरचे अधिकारी दाखल

भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील चार महिन्यांपासून असलेली शांतता आणि अफगाणिस्तानमधील अस्थिर स्थिती या पाश्र्वाभूमीवर अजित दोभाल यांचा बैठकितील सहभाग आणि द्विपक्षीय बैठक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र युसुफ यांच्यासोबतची बैठक अद्याप ठरलेली नाही, असेही सांगण्यात येत आहे. एससीओची शेवटची बैठक जास्त वादळी ठरली होती. जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) या केंद्र शासित प्रदेशाला पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला होता आणि त्याच्या निषेधार्थ अजित दोभाल  बैठकीतून माघारी आले होते. भारताने पाकिस्तानच्या या बेकायदेशीर कृतीला तीव्र हरकत घेतली होती आणि रशियानेही या नकाशाचा वापर न करण्याबाबत पाकिस्तानचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततापूर्ण संबंध असावे, असे सूचित करणारे वक्तव्य पाकिस्तानच्या लष्कराने केले होते. आणि आता दोन्ही देशांमधील संबंध उत्तम व्हावेत यासाठी दोन्ही देशांचे एनएसए काही महिन्यांपासून संपर्कामध्ये आहेत.

 शेजारी देशाबरोबर 'शांततापूर्ण सहअस्तित्व' हवे: तालिबान
अफगाणिस्तानातून फौजा माघारी घेण्यासाठी अमेरिकी आणि नाटो फौजा अमेरिकेचे अध्यक्ष जोल बायडन यांनी 11 सप्टेंबरची मुदत निश्चित केली असताना, तसेच अफगाणिस्तानमधील स्थिरतेसाठी भारताचे तालिबानला अनुकुल धोरण शंका आणि अनिश्चितेभोवती फिरत असताना आपल्याला शेजाऱ्यांबरोबर आणि या भागामध्ये शांततापूर्ण सह अस्तित्व हवे असल्याचे तालिबानने शनिवारी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com