भारत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या खरचं लपवत आहे का ? 

india corona deaths.jpg
india corona deaths.jpg

देशभरात कोरोना साथीच्या आजाराने थैमान घातले असून सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यासाठीही  खूप वेळ वाट पहावी लागत आहे.  नवी दिल्लीच्या गीता कॉलनी येथील स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. तर  कोरोनाने मृत्यू न झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीदेखील प्रचंड त्रास होत असल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपूर्वी कानपूरमधील भैरो स्मशानभूमी  घाटात 24 तासांत 476 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी केवळ 3 मृत्यू झाल्याची माहिती कानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेली आकडेवारी आणि माध्यमांनी सादर केलेली आकडेवारी पाहता भारतात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवत तर नाही ना असं प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. (Is India really hiding the death toll from the corona?) 

तथापि, मध्यमांमध्ये सांगण्यात आलेली आकडेवारी आणि प्रशासनाने दिलेली आकडेवारीत प्रचंड तफावत असल्याचे  दिसत आहे. तसेच, प्रशासन कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवत असल्याचे दिसत आहे. प्रसिद्धी मध्यमांकडून  एखादी आकडेवारी सांगण्यात चूक होणे शक्य आहे, मात्र, पाहायला गेल्यास प्रत्येक शहरातील स्मशानभूमीत होणारे मृत्यू आणि सरकारी आकडेवारीतील  प्रचंड तफावत  अत्यंत धक्कादायक आहे.  दरम्यान, देशातील अन्य वर्तमानपत्रे आणि न्यूयॉर्क टाइम्स आणि गार्डियन या परदेशी वृत्तपत्रांनीही कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या लपवण्याच्या मुद्द्यावरून  प्रश्न उपस्थित केले आहेत.  गार्डियन वृत्तपत्रानेही कोरोनाने झालेले आणि कोरोनाची चाचणी न करता झालेल्या मृत्युची संख्या याचा आढावा घेतला आहे. 

राजग्राममधील  औषध विक्रेता नूरुल अमीन यांना कोविडच्या लक्षणांची माहिती होती. परंतु, लक्षणे दिसत असूनही त्याने स्वतःला केवळ साधारण सर्दी खोकला झाल्याचे सांगत राहीला आणि रुग्णालायतही गेला नाही, त्यामुळे  काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती गावातील एक महिला शिक्षिकेने दिली आहे. तसेच अशाच प्रकारे कोरोनाची लक्षणे असूनही   आणि रुग्णालयात दाखल न झाल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील एक शिक्षिका महिलेने दिली आहे. 

एका ब्रिटीश वृत्तपत्राने गावे व शहरी गरीब लोकांच्या झोपडपट्ट्यांचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार, या ठिकाणी जागरूकता नाही.  गावे व शहरी गरीब लोकांच्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी अशा परिस्थितीत किती लोक चाचणी करून घेतात, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. इतकेच नव्हे तर, सध्या असे अनेक लोक आहे ज्यांना कोरोनाची चाचणी करण्याची इच्छा तर असते मात्र काही कारणांमुळे ते चाचणी करू शकत नाहीत. अशा कठीण परिस्थितीमध्ये खासगी लॅबने चाचणी करणे थांबवले आहे, तर सरकारी लॅबच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली असते, अशावेळी  कोरोना ग्रस्त व्यक्ति किंवा प्रचंड ताप असलेली व्यक्ति जर तासनतास उन्हात उभी राहून मरण पावली तर त्य व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झालेल्या मृतांच्या यादीत समावेश केला जाईल. 

मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक भमर चॅटर्जी यांनिदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. हिंदुस्थानात आकडेवारीचा नरसंहार चालू आहे. भारतात चालू असलेल्या सर्व घटनांवर त्यांचे बारीक लक्ष आहे.  त्यामुळए कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ही सरकारी आकडेवारीच्या संख्येपेक्षा पंचपट असू शकते, अशी अशी शक्यता भमर चॅटर्जी यांनी व्यक्त केली आहे. 

अमेरिकन वृत्तपत्राने अहमदाबादच्या स्मशानभूमीत काम  करणाऱ्या सुरेश नावाच्या माणसाशीही बातचीत केली.  मृतांची इतकी मोठी रांग आजपर्यंत मी कधीही पहिली नसल्याचे सुरेशचे म्हणणे आहे. तसेच,  तसेच मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे कच्चे प्रमाणपत्रही दिले जाते. कोणत्याही प्रमाणपत्रात संबंधित वेंकटीच्या मृत्यूचे स्पष्ट कारण लिहिले जात  नाही. सर्वांमध्ये फक्त एकच गोष्ट लिहिली जाते ती, या प्रमानपत्रणमध्ये आजारपण हे मृत्यू चे कारण म्हणून लिहिले जाते, मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाण पत्रावर  सुरेश स्वत:  मृत्यूचे कारण आजारपण'  असे लिहितो.  असे अमेरिकेच्या वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. या सर्व घडामोडी आणि घटना क्रम पाहता देशभरात कोरोना मृतांचा आकडा लपवला जातोय का, अशी शंका उपस्थित होत  आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com