कोरोनामुळे केलेला व्हिसा प्रतिबंध मागे; गृह मंत्रालयाची माहिती

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन व्हिसा सोडता सर्व ओसीई, पीईओ कार्ड धारक आणि इतर विदेशी नागरिक अन्य कोणत्याही कारणासाठी आता भारतात येऊ शकतात.

नवी दिल्ली- कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी देशात मार्चमध्ये व्हिसा देण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. भारत सरकारने आता हे प्रतिबंध हटवले असून इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि मेडिकल व्हिसा वगळता इतर व्हिसावरील प्रतिबंध शिथिल करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाकडून तशी माहिती आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

वायू किंवा जल मार्गाने  भारतात येता येईल-  

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन व्हिसा सोडता सर्व ओसीई, पीईओ कार्ड धारक आणि इतर विदेशी नागरिक अन्य कोणत्याही कारणासाठी आता भारतात येऊ शकतात. विदेशातून येताना ते कोणत्याही अधिकृत हवाई अड्ड्यावर किंवा सीपोर्ट चेक पोस्टवरून भारतात प्रवेश करू शकतात.  

कोरोना काळातील मार्गदर्शक सुचनांचे करावे लागेल पालन-

 भारतात येण्याची जरी अनुमती मिळाली असली तरी विदेशातून येणाऱ्यांना भारत सरकारच्या अलगीकरण आणि केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या कोविड-१९ गाईडलाईन्सचे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणारे आपल्याबरोबर एक वैद्यकीय सल्लागारासहित वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात. 
 

संबंधित बातम्या