Corona Update : देशात गेल्या 24 तासात 15,144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

भारतात काल कोरोनाचे नवे 15,144 रुग्ण सापडले. त्यामुळे आता आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,05,57,985 झाली आहे.

नवी दिल्ली : भारतात काल कोरोनाचे नवे 15,144 रुग्ण सापडले. त्यामुळे आता आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,05,57,985 झाली आहे. गेल्या 24 तासांत 17,170 रुग्ण बरे झाले आहेत. काल भारतात कोरोना लसीकरणास सुरवात झाली. काल देशभरातील एक लाख 65 हजार करोना योद्ध्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात या तीन कोटी आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. काल देशभरात लस दिल्यानंतर कुठेही विपरित परिणाम झाल्याची घटना नोंदवली गेली नाही.

भारतात  गेल्या 24 तासांत 181 रुग्णांचा मृत्यू झाला. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या भारतातील कोरोना मृतांची संख्या ही 1,52,274 आहे. सध्या देशात 2,08,826 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

महाराष्ट्रात काल  2910 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 19,87,678झाली आहे. महाराष्ट्रात काल 3039 कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात काल 52 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील आजपर्यंतच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 50,388 वर जाऊन पोहोचली आहे. या घडीला महाराष्ट्रात 51,965 ऍक्टीव्ह रूग्ण आहेत.

संबंधित बातम्या