कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव ; ६ जणांना 'ब्रिटन'मधील नव्या कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचे रूग्ण आता भारतातदेखील सापडले आहेत. ब्रिटनमधील परत आलेल्या सहा भारतीय नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये हे रूग्ण कोरोनाच्या ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले.

नवी दिल्ली :  ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचे रूग्ण आता भारतातदेखील सापडले आहेत. ब्रिटनमधील परत आलेल्या सहा भारतीय नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये हे रूग्ण कोरोनाच्या ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. यामध्ये बॅंगलोरच्या तपासणी संस्थेत तीन, हैदराबादच्या दोन आणि पुण्यातल्या एनआयव्हीमधील एक असे ६ नमुने नव्या कोरोना विषाणुने बाधित असल्याचे आढळले आहे. यामुळे, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाविषाणूच्या नव्या प्रकाराचे संक्रमण भारतात सुरू झाले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाविषाणूच्या या नव्या प्राकारामुळे विविध निर्बंध कायम ठेवत केंद्राने म्हटले आहे की, कोरोनाच्या रूग्णांमध्ये जागतिक स्तरावर होणारी वाढ आणि ब्रिटनमधील विषाणूच्या नव्या प्रकारामुळे नियंत्रण ठेवणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एका निवेदनात गृह मंत्रालयाने म्हटले कोरोना संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी 31 जानेवारीपर्यंत लागू केल्या आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिबंध करण्यासाठी कडक पावले उचलण्यास सांगितली आहेत. 

संबंधित बातम्या