''भारताला कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे''

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस विनामूल्य उपलब्ध करुन दिली गेली पाहिजे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्याची घोषणा केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशातील नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. (India should get corona vaccine for free)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अ‍ॅडजेक्टिव्ह आणि अ‍ॅडवर्बचं उदाहरण देत कोरोना लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. ‘’देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस विनामूल्य उपलब्ध करुन दिली गेली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लस टोचणे आवश्यक बनलं आहे. आशा करुया की यावेळी देशातील जनतेला कोरोना लस मिळेल,’’ असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्यासोबतच #Vaccine असं देखील जोडलं आहे.

गुजरातमध्ये 1000 खाटांचे कोविड सेंटर उभारणार; रिलायन्स फाउंडेशनची घोषणा 

तसेच, ‘’चर्चा खूप झाल्या आता देशातील प्रत्येक नागरिकांनी कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे. बसं एवढचं.. भारताला भाजपच्य़ा व्यवस्थेचा व्हिक्टिम बनवू नका,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी यापूर्वी केली होती.

‘’मोदी सरकारने हे लक्षात असायला हवं की लढाई कोरोनाविरोधात आहे. कॉंग्रेस किंवा देशातील अनेक अन्य राजकीय पक्षांविरोधात नाही.’’ असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्याचा बुधवारी निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना लसींचा मुबलक पुरवठा नसल्यामुळे महाराष्ट्र दिनापासून या वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरु होणार नाही, असं ठाकरे सरकारनं म्हटलं आहे. 
 

संबंधित बातम्या