ब्रिटनहून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराला 'कल्चर' करणारा भारत ठरला एकमेव देश

वृत्तसंस्था
रविवार, 3 जानेवारी 2021

भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत मोठं यश प्राप्त केलं आहे.

नवी दिल्ली :   भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत मोठं यश प्राप्त केलं आहे. कोरोना विषाणबच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. आयसीएमआर नी (Indian Concil of Medical Research) काल ट्विट करत यासंद्रभातील माहिती दिली. ज्यात भारताने कोरोना च्या ब्रिटनमध्यो आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराला (स्ट्रेन) 'कल्चर' केलं असल्याचं म्हटलं आहे. 'कल्चर' म्हणजे आशी प्रक्रिया ज्याअंतर्गत पेशींना नियंत्रित परिस्थितीमध्ये वाढवलं जातं आणि सामान्यत त्यांच्या नैसर्गिक वातावरणातून त्यांना बाहेर काढलं जातं. 

ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचे रूग्ण भारतातदेखील सापडले होते. ब्रिटनमधील परत आलेल्या भारतीय नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये काही रूग्ण कोरोनाच्या ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले होते. यामुळे, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाविषाणूच्या नव्या प्रकाराचे संक्रमण भारतातही सुरू होईल, अशी भिती व्यक्त केली जात होती.  

संबंधित बातम्या