भारतातडून ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण ; अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीपही दूरसंचाराच्या कक्षेत येणार

PTI
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

भारताने  ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रहाचे काल ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केले.

श्रीहरीकोटा : भारताने  ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रहाचे काल ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केले.  हा इस्रोचा ४२ वा संवाद उपग्रह आहे. तो अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना आपल्या कवेमध्ये घेईल. हा उपग्रह सी बँड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून सेवा देऊ शकेल.

कोरोनाकाळातील हे दुसरे प्रक्षेपण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ‘पीएसएलव्ही-सी ५०’ या प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतल्यानंतर वीस मिनिटांनी हा उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्यात आला.  आज दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले या उपग्रहाचा जीवनकाळ हा सात वर्षांचा असेही इस्रोकडून सांगण्यात आले.

 

‘जीसॅट-१२’ ऐवजी

‘सीएमएस-०१’ हा उपग्रह ‘जीसॅट-१२’ या उपग्रहाची जागा घेईल. पूर्वीच्या उपग्रहाचे वजन १ हजार ४१०  एवढे वजन होते.  या उपग्रहाला ११ जुलै २०११ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. आजची मोहीम ही इस्रोची चालू वर्षातील शेवटची मोहीम होती.

 

अधिक वाचा :

एमसीआय’च्या निर्णयाने परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय

असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमची ‘मिशन यूपी’ला सुरुवात 

 

 

संबंधित बातम्या