रश्मी सामंत मुद्द्यावरून भारताची ब्रिटनला चपराक, 'ऑक्सफर्डप्रकरणी गप्प बसणार नाही!'

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 मार्च 2021

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षपद मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय म्हणून मान मिळवलेल्या रश्मी सामंत यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षपद मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय म्हणून मान मिळवलेल्या रश्मी सामंत यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. "रश्मी सामंत या वर्णभेदाच्या शिकार झाल्या असून, त्यांच्यावर झालेली कारवाई ही वर्णद्वेषातून झाली आहे', असे मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केले. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर ज्या प्रमाणे ब्रिटनच्या संसदेत चर्चा झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर रश्मी सामंत यांच्यासोबत वर्णभेदामुळे झालेल्या अन्यायावर ब्रिटनची संसद शांत कशी असू शकते असा प्रश्न देखील एस जयशंकर यांनी उपस्थित केला. आम्ही गांधींच्या भूमीतून आलेलो असल्याने या प्रकरणावर दुर्लक्ष करू शकत नाही असेही ते यावेळी पुढे  राज्यसभेत म्हणाले.  

कृषी कायद्यानंतर केंद्राचा मोर्चा दिल्लीकडे; नव्या विधेयकावरून दिल्ली सरकार व...

कोण आहेत रश्मी सामंत -  
रश्मी सामंत या मूळ भारतीय असून कर्नाटकच्या मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नुकत्याच त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या स्टुडंट्स युनियनच्या निवडणुकीत 3,708 मतांपैकी 1,966 मते मिळवली आणि त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. यापदावर जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. त्यांच्यासोबत अजून इतर भारतीय विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ही निवडणूक लढवताना त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात भारतीय मूल्यांच्या आधारे धोरण ठरवले होते.

रश्मी सामंत यांना का द्यावा लागला राजीनामा ?
2017 साली रश्मी सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या काही फोटो आणि मजकुरातून त्यांनी वर्णभेद,साम्यविरोधी आणि हिंसाचाराशी निगडित वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याच्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर आपण एका विशेष रंगाची असते तर आपल्यावर ही कारवाई झाली नसती, असे मत रश्मी सामंत यांनी एका भारतीय वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या