भारताने चीनला ठणकावले; स्थिती काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

अरुणाचल प्रदेशातील पाच तरुणांचे चीनच्या लष्कराने अपहरण केले असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी आज ट्विटच्या माध्यमातून केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

चीनकडून पाच भारतीय तरुणांचे अपहरण?
अरुणाचल प्रदेशातील पाच तरुणांचे चीनच्या लष्कराने अपहरण केले असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी आज ट्विटच्या माध्यमातून केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे चीनला आता सडेतोड उत्तर द्यायला हवे, अशी मागणी एरिंग यांनी केली आहे. विशेष म्हणजे, कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी देखील याला दुजोरा दिल्यानंतर अरुणाचल पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे उत्तर सिक्कीममध्ये रस्ता चुकल्याने हरवलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय लष्कराने मदत करत त्यांना वैद्यकीय मदत देऊन त्यांना योग्यस्थळी नेऊन सोडल्याची घटना उघड झाली आहे. 

ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा भारत-चीन संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शविली आहे. उभय देशांतील संबंध हे खूपच बिघडले असून, चीन देखील तितकीच आक्रमक भूमिका घेतो आहे. अशा स्थितीमध्ये या दोन्ही देशांतील वाद मिटविण्यासाठी आपल्याला मदत करायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या