आंतरराष्ट्रीय विमानसेवा 27 मार्चपासून सुरू

देशातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा 27 मार्चपासून सुरू
flight
flightdainikgomantak

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या माहामारीमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडणारी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. तर जस जसे कोरोनाचे संकट कमी होत गेले तसतसे देशांतर्गत आणि काही देशात विमान सेवा सुरू करण्यात आली होती. तर भारत सरकारने 27 मार्चपासून सर्व व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही सेवा पुन्हा सुरू करताना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असेही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) स्पष्ट केले आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया (Union Minister Jyotiraditya M Scindia) यांनी ट्विटरवर ट्विट करताना, या निर्णयामुळे हे क्षेत्र नवीन उंची गाठेल, असे म्हटले आहे.

flight
'या' महिलांना 'Nari Shakti Puraskar'ने करण्यात आले सन्मानित

तसेच, आमच्या भागधारकांशी चर्चा केल्यानंतर आणि कोरोना प्रकरणातील घट लक्षात घेऊन, आम्ही 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर एअर बबल (Air Bubble) व्यवस्था देखील रद्द केली जाईल. या पाऊलाने, मला खात्री आहे की हे क्षेत्र निश्चितपणे नवीन उंची गाठेल असेही सिंधिया (Jyotiraditya M Scindia) म्हणाले.

कोरोनाचा (corona) वाढता प्रसार रोखण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 23 मार्च 2020 पासून भारतात आणि भारतातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे थांबविली होती. तर DGCA च्या 28 फेब्रुवारी 2022 च्या परिपत्रकानुसार, भारतातून (India) होणाऱ्या आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांवरील (international commercial passenger services) स्थगिती पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com