भारताने घेतलेल्या पुढाकाराने पर्यावरणाबाबतची उद्दीष्ट्ये साध्य होतील : यूएन

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

सौर ऊर्जेच्या वापरात आणि औद्योगिक बदलांमध्ये भारताने घेतलेला पुढाकार पाहून पर्यावरणाबाबतची उद्दीष्ट्ये साध्य होतील,

न्यूयॉर्क: सौर ऊर्जेच्या वापरात आणि औद्योगिक बदलांमध्ये भारताने घेतलेला पुढाकार पाहून पर्यावरणाबाबतची उद्दीष्ट्ये साध्य होतील, असा विश्‍वास ठेवायला जागा आहे, असे कौतुकोद्गार संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना महंमद यांनी काढले. 

कोरोना नंतरच्या काळात अनेक देश अर्थव्यवस्थेला गती आणण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचा विकास केवळ शाश्‍वतच नाही, तर रोजगारनिर्माण करणारा असावा, अशी अपेक्षाही अमिना यांनी व्यक्त केली. 
 ‘पीपल  अँड क्लायमेट चेंज’ या विषयावरील वेबिनारमध्ये अमिना उत्साहवर्धक घडामोडींबाबत म्हणाल्या की, ‘जपान आणि कोरियाने २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय निश्‍चित केले आहे. 

चीननेही हे ध्येय २०६० पर्यंत गाठण्याची हमी दिली आहे. भारताने सौर ऊर्जेच्या वापरात आणि आद्योगिक बदलांमध्ये घेतलेला पुढाकार आशादायी असून यामुळे पर्यावरणाबाबतची उद्दीष्ट्ये साध्य होतील.’

आणखी वाचा:

संबंधित बातम्या