गांधीच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली;भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

महात्मा गांधींच्या चुकीमुळेच अखंड भारताची फाळणी झाली असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी केलं.शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी अशाप्रकारचं वादग्रस्त विधान केलं.

भोपाळ:महात्मा गांधींच्या चुकीमुळेच अखंड भारताची फाळणी झाली असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी केलं.शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी अशाप्रकारचं वादग्रस्त विधान केलं. यापूर्वी भाजपच्या भोपाळमधील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेला देशभक्त असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.शर्मा यांचं हे विधान सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालं आहे.भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजीत केलेल्या कार्यक्रमात रामेश्वर शर्मा उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात बोलत असताना गांधींना भारताच्या फाळणीला जबाबदार ठरवलं आहे."काय आहे दिग्विजय सिंहाचं काम आणि कार्य महम्मद अली जिनापेक्षा जास्त धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं.आधी जिनांच्या हट्टामुळे देशाची फाळणी झाली.नंतर 1947 ला भारत स्वातंत्र्याच्या मुहुर्तावर बापूंच्या चुकीमुळे भारताची फाळणी झाली.तसचं विभाजन करण्याचं सिंह करत आहेत,असंही शर्मांनी म्हटलं.यापूर्वी ही रामेश्वर शर्मा वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठीचं ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच 'कॉंग्रेस दगडफेक करणाऱ्यांच समर्थन करत असल्याचं पुढं यावं आणि त्याची जबाबदारी घ्यावी.राज्यातील सामाजिक सहौर्द खराब करण्याची कुणालाच परवानगी असणारं नाही आणि यासाठीचं राज्यसरकार कडक कायदे करत आहे"

संबंधित बातम्या