"प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान हा देशासाठी मोठा धक्का" : पंतप्रधान मोदी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

“प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याचा अपमान हा भारतासाठी मोठा धक्का होता. आपल्या तिरंग्याचा झालेला असा अपमान बघून भारतीयांना अतीव दु:ख झालं”.

नवी दिल्ली : “प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याचा अपमान हा भारतासाठी मोठा धक्का होता. आपल्या तिरंग्याचा झालेला असा अपमान बघून भारतीयांना अतीव दु:ख झालं”, असं पंतप्रधान मोदी आज मन कि बात मध्ये म्हणाले. प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर पंतप्रधानांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या मन कि बात मधून त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघांचं देखील कौतुक केलं.

'इस्राईल'ची जगातील सर्वात शक्तीशाली गुप्तहेर संस्था करणार दिल्ली...

प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसत शीख धर्मिय  ध्वज फडकवला होता. या प्रकाराबद्दाल बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले होते,”घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल. लाल किल्ल्यात तिरंग्याचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला, हे भारत खपवून घेणार नाही."पंजाबी अभिनेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप असलेल्या दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी हिंसाचाराठी जबाबदार धरले आहे.घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे.

'जागतिक पातळीवर भारताचे नाव गांधींमुळे पोहोचले'

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर सध्या दीप सिध्दू हे नाव चर्चेत आहे. दिप सिध्दू हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी आपले हात वर केले आहे. असा आरोप केला जात आहे की, या व्यक्तीने शेतकऱ्यांचे आंदोलन लाल किल्ल्याकडे वळवले, त्यानंतर हिंसाचार पसरला. हा अभिनेता भाजप तसेच आरएसएसचा एजंट असल्याचेही आरोप आता होऊ लागले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवणाऱ्या विरोधकांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी अभिनेता दीप सिध्दू याने या प्रकरणाच्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे कबूल केले आहे.

प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या 20 शेतकरी नेत्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये ट्रॅक्टर परेडसाठी पोलिसांसोबत झालेल्या कराराचा शेतकरी नेत्यांनी भंग केल्याचा उल्लेख आहे.दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावलेल्या नेत्यांमध्ये योगेंद्र यादव, बलदेवसिंग सिरसा, बलबीर एस राजेवाल यांच्यासह अन्य 17 शेतकरी नेत्यांचा समावेश आहे.

 कृषी विधेयकाच्या आंदोलनासाठी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसाचार घडल्यामुळे दोन शेतकरी संघटनांनी आधीच आंदोलनातून माघार घेतली आहे. यामध्ये भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचा समावेश आहे. संयुक्त किसान मोर्चाने संयुक्त किसान हिंसाचार झाल्यामुळे प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्चर परेडमध्ये सहभाग घेतला नव्हता. या नोटीसांना उत्तर देण्यासाठी त्यांनी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या