" लाल किल्ल्यावर तिरंग्याचा झालेला अपमान भारत खपवून घेणार नाही "

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर केंद्र सरकारने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर केंद्र सरकारने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसत शीख धर्मिय  ध्वज फडकवला होता. या प्रकाराबद्दाल बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले,”घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल. लाल किल्ल्यात तिरंग्याचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला, हे भारत खपवून घेणार नाही."

Farmers Protest : हिंसक घटनेनंतर ट्विटरने बंद केली 550 हून अधिक जणांची टिव-टिव...

पंजाबी अभिनेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप असलेल्या दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी हिंसाचाराठी जबाबदार धरले आहे.घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर सध्या दीप सिध्दू हे नाव चर्चेत आहे. दिप सिध्दू हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी आपले हात वर केले आहे. असा आरोप केला जात आहे की, या व्यक्तीने शेतकऱ्यांचे आंदोलन लाल किल्ल्याकडे वळवले, त्यानंतर हिंसाचार पसरला. हा अभिनेता भाजप तसेच आरएसएसचा एजंट असल्याचेही आरोप आता होऊ लागले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवणाऱ्या विरोधकांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी अभिनेता दीप सिध्दू याने या प्रकरणाच्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे कबूल केले आहे.

Delhi Tractor Parade Violence "शेतकऱ्यांच्या हिंसेला दिल्ली पोलिसच जबाबदार...

कॉंग्रेसवर टिका करत जावडेकर म्हणाले, "राहुल गांधी केवळ शेतकऱ्यांचे समर्थनच करत नव्हते तर त्यांना भडकावत होते. सीएएच्या वेळीदेखील हेच घडलं. कॉंग्रेसच्या मेळाव्याची चर्चा होती आणि दुसर्‍या दिवशी लोक रस्त्यावर आले.परवादेखील असेच घडले. त्यादिवशीचे ट्वीट्स सर्वांसमोर आहेत.” प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान घडलेल्या हिंसाचाराबद्दल दाखल झालेल्या वेगवेगळ्या 25 गुन्ह्यांतर्गत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या हिंसाचाराशी शेतकरी नेत्यांचा काही संबंध होता का, याचीदेखील चौकशी सुरू आहे.

 

 

 

संबंधित बातम्या