भारतीय वायू सेनेतील मिग 21 कोसळले; अपघातात ग्रुप कॅप्टन शहीद 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

भारतीय वायू सेनेतील लढाऊ विमान मिग 21 बाईसनचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय वायू सेनेतील लढाऊ विमान मिग 21 बाईसनचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान मध्य भारतातल्या एका एअरबेस वरून लढाईच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते. त्यानंतर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजते. दुर्दैवाने या अपघातात पायलट ग्रुप कॅप्टन एस गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मृत्युमुखी पडलेल्या ग्रुप कॅप्टन एस. गुप्ता यांच्याबद्दल भारतीय वायू सेनेने संवेदना व्यक्त केल्या आहेत. (Indian Air Force fighter jet MiG-21 crashed)

भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाबाबत रेल्वे मंत्र्यांचं मोठं विधान

आज भारतीय वायू सेनेतील (Indian Air Force) मिग 21 बाईसन या लढाऊ विमानाचा अपघात झाला. त्यानंतर या अपघातात भारतीय वायू सेनेतील वैमानिक ग्रुप कॅप्टन एस गुप्ता यांना आपला जीव गमवावा लागला. तर या अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. त्यानंतर भारतीय वायू सेनेने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करताना ग्रुप कॅप्टन एस. गुप्ता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तसेच ग्रुप कॅप्टन एस. गुप्ता यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे भारतीय वायू सेनेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. आणि वायू सेनेने या अपघाता मागचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. (MiG-21 crashed)

आजवर मिग 21 विमानाचे अनेकदा अपघात झाले असून, या अपघातांमध्ये आतापर्यंत कुशल लढाऊ वैमानिकांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे. हे विमाने जुनी झाली असून, भारतीय वायू दलात 1960 च्या दशकात या विमानांचा समावेश करण्यात आला होता. भारताने रशियाकडून ही विमाने खरेदी केली होती. अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे टप्प्या टप्प्याने ही विमाने भारतीय हवाई दलातून कमी करण्यात येत आहेत. दरम्यान मिग 21 विमान अपघातांचा विषय घेऊन 2006 साली चित्रपट दिगदर्शक राकेश मेहरा यांनी "रंग दे बसंती" या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.  (Indian Air Force fighter jet MiG-21 crashed) 

संबंधित बातम्या