Army Chief Manoj Pande: चीनने सीमेवरील सैन्यात घट केली नाही; परिस्थिती कधीही बदलू शकते!

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे वक्तव्य; सावध राहण्याची गरज
Army Chief General Manoj Pande
Army Chief General Manoj PandeDainik Gomantak

Army Chief General Manoj Pande: चीनने एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल- प्रत्यक्ष ताबा रेषा) वरील सैन्यात घट केलेली नाही. पूर्व लडाखमधील स्थिती सध्या स्थिर दिसत असली तरी त्याबाबत निश्चित्त असे काहीच सांगता येत नाही. येथील स्थितीमध्ये कधीही बदल होऊ शकतो, असे वक्तव्य देशाचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी केले आहे. चाणक्य डायलॉग्ज येथे थिंक टँक ग्रुपमध्ये ते बोलत होते.

Army Chief General Manoj Pande
Pakistan's Drones : सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीत तब्बल 250 टक्क्यांची वाढ

मनोज पांडे म्हणाले की, एलएसीवर आम्हाला खूप सावधान राहण्याची गरज आहे. तरच आपण आपले संरक्षण करू शकू. चीनने ना त्यांचे सीमेवरील सैन्य घटवले आहे ना त्यांनी तेथील पायाभूत सुविधा कमी केल्या आहेत. 2020 मध्ये जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता तेव्हापासून भारत आणि चीनने आपापल्या सैनिकांना पेट्रोलिंग पॉईंट-15 जवळ तैनात केले होते.

सीमावादातील सात पैकी पाच मुद्ये चर्चेतून सोडवले गेले आहेत. आम्ही दोन्ही देशात सध्या कमांडर लेव्हलच्या 17 व्या फेरीतील चर्चेचा विचार करत आहोत. या बैठकीत देपसांग आणि डेमचोक यावर चर्चा होऊ शकते. यापुर्वी 17 जुलै रोजी कमांडर लेव्हलची चर्चा झाली होती. तर 8 सप्टेंबर 2022 पासून सैन्य मागे हटण्यास सुरवात झाली होती ही प्रक्रिया 13 सप्टेंबर रोजी पुर्ण झाली.

Army Chief General Manoj Pande
Cruise Ship With 800 Corona cases: ऑस्ट्रेलियात हॉलिडे ट्रिपवर असलेल्या क्रुझमध्ये 800 कोरोनारूग्ण

चीनच्या उक्ती आणि कृतीत फरक

जनरल मनोज पांडे म्हणाले की, चीनची भूमिका दुटप्पी आहे. चीन बोलतो एक आणि करतो दुसरेच. सर्वांनाच माहिती आहे चीन काय करतो. तो त्यांच्या स्वभावाचा, चारित्र्याचा भाग आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सीमेवर त्यांनी सैन्यकपात केलेली नाही. पण थंडीला सुरवात झाली तेव्हा काही सैन्य माघारी जाणार असल्याचे संकेत मिळाले होते.

2020 मध्ये चीनने पुर्व लडाखमध्ये सीमावर्ती भागात हालचाली वाढवल्या होत्या. सैन्य तैनात केले होते. त्यानंतर काही ठिकाणी घुसखोरीही केली. प्रत्युत्तरात भारतीय सैन्यानेही मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com