VIDEO: काश्मीरमध्ये जवानांनी केली अनोळखी व्यक्तींच्या ‘चहा-नाश्त्याची’ सोय

Indian Army
Indian Army

देशवासीयांच्या हृदयात भारतीय सैन्याबद्दल(Indian Army) नेहमीच आदर आणि प्रेम आहे. भारतीय सैनिकही त्यांच्या पराक्रमी आणि मोठ्या मनासाठी ओळखले जातात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ(Video) जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की एक सीआरपीएफ(CRPF) जवान काही क्रॉस कंट्री वॉकर्सना चहा पिण्यासाठी पैसे देतांना दिसत आहे. हा व्हिडिओ(Video) काश्मीरचा आहे. काश्मीरमध्ये सैन्याबाबत अनेकदा निषेध होतांना पाहायला मिळतो. पण हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून जाणारा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सीमेवर पोस्ट केलेल्या सैनिकांमधील प्रेम आणि आदर केवळ त्यांच्या देशातीलच नाही तर सीमा ओलांडणाऱ्या लोकांबद्दल किती आहे हे पाहायला मिळत आहे. कारण ती भावना केवळ पैशाची नसून उत्कटतेची आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या जवानांच्या उदारपणाचे लोकं भरभरून कौतुक करत आहे.(Indian Army jawan in Kashmir gave 100 rupees to stranger for tea and snack)

हा व्हिडिओ आयपीएस एसएस भाटिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. "हार्ट ऑफ Gold, सीएसपीएफ इंडिया जवान, काश्मीर मधील क्रॉस कंट्री वॉकरला चहा पिण्यासाठी काही पैसे दिले! एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे देण्याचा विचार करण्यास देखील मोठे हृदय लागते. निस्वार्थ सेवेचे आणखी एक उदाहरण! या भावनेसाठी आमच्या शूरवीरांना सलाम." असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे.

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 65 हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर आतापर्यंत 900 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे.

लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजर्सने “ऐसे बड़े दिल और कहा मिलेंगे, जय हिंद” अशी कमेंट केली. तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “हे माझ्या भारताचे वैशिष्ट्य आहे, कमेंटमध्ये लोक सीआरपीएफ जवान आणि सैन्याचे कौतुक करत आहेत. बर्‍याच लोकांनी या युवकाला “सोन्याचे हृदयाचा जवान” ही पदवी देऊन गौरवही केला आहे. प्रत्येकजण या तरूणाला अभिवादन करीत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला या तरूणाचा अभिमान वाटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com