पाकचा ‘नापाक’ इरादा उद्‌ध्वस्त

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

 गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती वाढलेल्या असताना आज भारतीय जवानांनी या कुरापतींना चोख उत्तर दिले. पाकिस्तानने आज उरी ते गुरेज विभागापर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला.

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती वाढलेल्या असताना आज भारतीय जवानांनी या कुरापतींना चोख उत्तर दिले. पाकिस्तानने आज उरी ते गुरेज विभागापर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात ४ जवानांसह १० जण मृत्युमुखी पडले. तसेच चार जवानांसह सहा नागरिक जखमी झाले. यावेळी भारताने जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात पाकिस्तानचे ७ ते ८ सैनिक ठार झाले. पाकिस्तानच्या बाजूने मोठे नुकसान झाले असून अनेक खंदक आणि लाँचपॅड उद्‌ध्वस्त झाले. सीमेवरील पाकच्या काही चौक्याही नष्ट करण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानने आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दावर, केरन, उरी आणि नौगांव या सेक्टरमध्ये बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्यांत एका कॅप्टनचा समावेश आहे. 

संबंधित बातम्या