भारतीय लष्कराकडून रामपूर सेक्टरमध्ये शस्त्रसाठा हस्तगत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

भारतीय लष्करास मिळालेल्या गुप्त माहितीवरून, बीएसएफ, लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्या संयुक्त पथकाकडून सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सीमा रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 

रामपूर: रामपूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांना मंगळवारी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात यश आले. जवानांकडून या भागात राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत पाच एके ४७ रायफल्स, सहा पिस्तुले, २३ ग्रेनेड आणि जवळपास बाराशे पेक्षा अधिक काडतुसे असा मोठ्या प्रमाणवर शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. 

भारतीय लष्करास मिळालेल्या गुप्त माहितीवरून, बीएसएफ, लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्या संयुक्त पथकाकडून सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सीमा रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवरील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्‍याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले होते. एका बाजूने चीन व दुसऱ्या बाजूने पाकिस्‍तानकडून कुरापत काढणे सुरूच आहे. 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या