चीन संघर्षानंतर भारताने घेतला मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्याच्या मध्यात मोठा संघर्ष झाला होता.

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्याच्या मध्यात मोठा संघर्ष झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता भारताने आपल्या माउंटन सैनिकांच्या तुकडीत 10,000 अतिरिक्त सैनिकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माउंटन स्ट्राइक कॉर्प्स या तुकडीचे मजबुतीकरण हे पाकिस्तानच्या सीमेकडून चीनवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सैन्याने घेतलेल्या चरणांचा एक भाग असल्याचे समजते. याशिवाय, पूर्व विभागातील सुमारे 10,000 सैन्यासह सध्या अस्तित्त्वात असलेली प्रभाग रचना आता 17 माउंटन स्ट्राइक कोर्प्सला देण्यात आली असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या पनागढमध्ये मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Indian Army strengthens mountain strikes corps looking after China border)

धक्कादायक! कोरोनाच्या लसी ऐवजी महिलांना देण्यात आली रेबीजची लस

याशिवाय, माउंटन स्ट्राइक कॉर्प्सबद्दल दशकांपूर्वीच केंद्राने निर्णय घेतला होता आणि त्यावेळेस एकच विभाग जोडलेला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र आता आता नवीन कार्यवाही करण्याबरोबरच अधिक कार्यक्षमता व मनुष्यबळाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  अलिकडच्या काळात सैन्यानेही बरेच बदल करत रीबॅलेन्सिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, बर्‍याच रचनांना दुहेरी कामे दिली गेली आहेत. तसेच, पूर्व लडाख आणि इतर भागात चीन सोबत झालेल्या संघर्षानंतर चीन सीमेकडे अधिक लक्ष देण्याचे धोरण भारताने अवलंबले आहे. 

तसेच, भारतीय लष्करासह (Indian Army) अन्य सुरक्षा दलांनीही चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) शेजारच्या लडाख सेक्टर आणि इतर डोंगराळ भागात उन्हाळ्याच्या तैनातीसाठी परत जाण्यास सुरवात केली आहे. मथुरा येथील वन स्ट्राइक कोर्प्सची पुनर्रचना करण्यात आली असून ती उत्तर सीमांच्या दिशेने तैनात करण्यात येणार आहे. शिवाय, एक आर्मर्ड फॉर्मेशन्स या तुकडीसोबतच राहणार आहे. चीन सोबतच्या शुगर क्षेत्र, मध्यवर्ती क्षेत्र आणि उत्तर-पूर्व सीमावर्ती भागांमध्ये सैन्याच्या तैनात करण्याचे कामही बळकट करण्यात आले आहे.

राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पॅंगॉन्ग त्सो (Pangong Tso) सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून भारत आणि चीनच्या सैन्याने माघारी घेतली होती. तर अन्य भागातील संघर्ष ठिकाणांहून सैन्याच्या डी-एस्केलेशनसाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात झालेल्या सैन्य स्तरावरील मागील कोर कमांडर बैठकीत भारताने चिनी सैन्याने गोग्रा, हॉट स्प्रिंग्ज आणि देपसांग सरोवरापासून माघार घेण्याचे सांगितले होते. त्यानंतर आता चिशोलम येथे भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात अकराव्या फेरीच्या कॉर्प्स कमांडर चर्चेचे आयोजन केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.   

संबंधित बातम्या