Indian Coast Gard ने खोल समुद्रात फडकावला तिरंगा,Video Viral

Har Ghar Tiranga Campaign: भारतीय तटरक्षक दलाने खोल समुद्रात उतरून तिरंग्याचे प्रदर्शन केले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Indian Coast Gard
Indian Coast GardDainik Gomantak

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय तटरक्षक दल अनोख्या पद्धतीने तिरंगा फडकवताना दिसत आहे. जे पाहून तुमची छाती अभिमानाने वाढेल. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ पी एम मोदींनी 'हर घर तिरंगा'(Har Ghar Tiranga) मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Gard) समुद्रात तिरंगा फडकवल्याचा डेमो केला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ मोदी सरकारने अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली आहे, ज्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. हे अभियान 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान आहे. या मोहिमेअंतर्गत सरकार देशातील 20 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याच्या तयारीत आहे.

15 ऑगस्ट रोजी देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. भारतीय तटरक्षक दल खोल समुद्रात उतरले आणि तिरंगा फडकवला( Flag Hoisting In Water) आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Gard) आपल्या ट्विटर हँडलवरून समुद्रात तिरंगा फडकवतानाचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे. ज्या युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे ते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com