India-Australia: भारतात घेतलेली पदवी आता ऑस्ट्रेलियातही वैध, शिष्यवृत्तीही मिळणार

ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथे आंतरराष्ट्रीय कॅम्पस उभारणार आहे.
India-Australia
India-AustraliaTwitter

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पीएम अँथनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना पाहणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत सरकार यांच्यात 'ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षा योग्यता मान्यता तंत्र' अंतिम झाली आहे. अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी दिली.

तसेच, ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथे आंतरराष्ट्रीय कॅम्पस उभारणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

India-Australia
Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

'द्विपक्षीय शैक्षणिक संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. मला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आम्ही 'ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षा योग्यता मान्यता तंत्र' याला मान्यता दिली आहे.' असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.

"या नवीन यंत्रणेचा अर्थ असा होतो की, जर तुम्ही भारतीय विद्यार्थी असाल आणि ऑस्ट्रेलियात शिकत असाल किंवा शिक्षण पूर्ण केले असेल, तर तुम्ही मायदेशी परतल्यावर तुमच्या कष्टाने मिळवलेली तुमची पदवी वैध धरली जाईल. तसेच, तुम्ही ऑस्ट्रेलियातील मोठ्या भारतीय समुदायेच सदस्य असाल (500,000 लोकसंख्या) तर तुमची भारतीय पदवी ऑस्ट्रेलियामध्ये ग्राह्य धरली ओळखली जाईल," असे अल्बानीज म्हणाले.

"यामुळे ऑस्ट्रेलियन शिक्षण संस्थांना भारतीय विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुलभ शिक्षण देण्यासाठी व्यावसायिक संधींचा मार्ग मोकळा झाला. तसेच, शिक्षण संस्थांना एकमेकांसोबत भागीदारी करण्याचे नवीन मार्ग देखील खुले झाले आहेत." असे अल्बानीज म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज अहमदाबाद येथे उभय देशात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. दोघांनीही सुरूवातीला दोन्ही देशांच्या कर्नधारांची भेट घेतली. मोदी व अल्बानीज यांनी सामान्यातील काही क्षण आपल्या ट्विटर अकाऊंटनर शेअर केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com