जेष्ठ नागरिकांना मिळणार नोकरी करण्याची संधी

ज्येष्ठ नागरिक आजपासून सरकारी पोर्टलद्वारे नोकरीसाठी अर्ज करू शकणार
जेष्ठ नागरिकांना मिळणार नोकरी करण्याची संधी
Indian Government to launch online job portal for senior citizensDainik Gomantak

नवी दिल्ली: जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरही नोकरी करायची असेल तर सरकारी (Government) बाजूने मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ नागरिक (senior citizens) आजपासून सरकारी पोर्टलद्वारे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने (Ministry of Social Justice & Empowerment) या प्रकारचा हा पहिलाच पुढाकार घेतला आहे.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (MoSJ&E) 60 वर्षांवरील वरिष्ठ सक्षम नागरिकांना पुन्हा नोकरीसाठी (SACRED) शोधण्यात मदत करणार आहे. पण हे सर्व वर्चुअल प्लेटफॉर्मद्वारेच होणार आहे.

Indian Government to launch online job portal for senior citizens
गांधीजींना आठवत मोदींचे स्वच्छ भारत मिशन 2.0 !

अनेक कंपन्यांना लिहिले पत्र

सामाजिक न्याय आणि अधिकारिता सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले की, हे व्यासपीठ वृद्धांना कामाच्या संधी देण्यासाठी अनेक संस्थांना एकत्र आणणार आहे. मंत्रालयाने विविध उद्योगांना पत्र लिहिले. जसे की, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), आणि असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) या कंपन्यांना रोजगारासाठी पत्र लिहिले आहे.

Indian Government to launch online job portal for senior citizens
बंगळूरुमध्ये गांधी जयंतीला मांस विक्रीवर बंदी

ज्येष्ठ नागरिकांची भरती कशी होणार?

60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक त्यांच्या अनुभवानुसार, शिक्षण, कौशल्य आणि आवडीच्या क्षेत्रात सरकारी पोर्टलवर जावून नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर हे पोर्टल नोकऱ्यांची हमी देत ​​नाही असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, परंतु नोकरी शोधणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची हमी मात्र सरकारने दिली आहे. पोर्टलद्वारे फ्रीलान्स आणि प्रो-फ्री वर्क मॉडेललाही परवानगी दिली जाणार आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन कामांचे प्रशिक्षणही दिले जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com