जम्मू-कश्मीरः लेफ्टनंट कर्नलनेच उचलले धक्कादायक पाऊल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

हल्ली आत्महत्येचे प्रमाण खुप वाढले आहे. काहीही झाले थोडेसे डिप्रेशन आले तर सरळ आत्महत्येसारख मोठ पाऊल उचलतात. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा मोठा अधिकारी.

श्रीनगर: हल्ली आत्महत्येचे प्रमाण खुप वाढले आहे. काहीही झाले थोडेसे डिप्रेशन आले तर सरळ आत्महत्येसारख मोठ पाऊल उचलतात. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा मोठा अधिकारी. अशातच श्रीनगरच्या सरहद्दीवरील खानमोह येथे एका लेफ्टनंट कर्नलने स्वत: ला गोळ्या घालून ठार केले आहे.

या भारतीय लष्करी अधिकाऱ्याने असे भयानक पाऊल का उचलले याचा तपास केला जात आहे. या धाडसी कर्नलने स्वत: ला का गोळी मारून घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज बुधवारी डिपोमध्ये तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल सुदीप भगत यांनी स्वत: ला गोळी झाडून ठार केले आणि त्या जागीच मृत्यूमुखी पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी जम्मू विभागातील अखनूरमध्ये सैन्याच्या जवानांनी आत्महत्या केली. या शिपायाने देखील स्वत: ला गोळी झाडून ठार केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहितं? PMO ने दिली माहिती 

 

संबंधित बातम्या