भारताची पुन्हा कॅनडाला समज

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने आज कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून समज दिली.

नवी दिल्ली: कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने आज कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून समज दिली. अशा प्रकारे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सुरू राहिल्यास द्वीपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा सज्जड इशाराही दिला. 

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. यानंतरही असे प्रकार (हस्तक्षेपाचे) सुरू राहिले तर दोन्ही देशांमधील संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे टोकाची विचारसरणी असलेल्या समूहांना प्रोत्साहन मिळाले असून ते कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत पोहोचू शकतात, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी नोंदवली. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आंदोलनामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाल्याचे म्हटले होते. कॅनडा शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाचा समर्थक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी तत्काळ कॅनडाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य फेटाळले होते.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या