INS Vela समुद्रात उतरण्यास सज्ज
INS Vela समुद्रात उतरण्यास सज्ज Dainik Gomantak

INS Vela समुद्रात उतरण्यास सज्ज

INS Vela: "पाणबुडीचे ब्रीदवाक्य 'जागृत, शूर, विजयी ' हे हातातील कार्य साध्य करण्यासाठी पाणबुडीच्या आत्म्याचे प्रतीक आहे," असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

भारतीय नौदलाने त्यांच्या ताफ्यात नवीन पाणबुडी, आयएनएस वेला (INS Vela) सरकारी मालकीच्या मझगाव डॉक शिपबुलडर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Ltd), किंवा एमडीएल ने बांधलेली स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडीचे स्वागत केले आहे.

"पाणबुडीचे ब्रीदवाक्य 'जागृत, शूर, विजयी ' हे हातातील कार्य साध्य करण्यासाठी पाणबुडीच्या आत्म्याचे प्रतीक आहे," हे ब्रिदवाक्य क्रूला सतर्कतेसाठी प्रेरित करते आणि पाणबुडीसमोरील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी नेहमी तयार असते आणि प्रत्येक वेळी विजयी होते, "नौदलाने आज एका निवेदनात अशी माहिती दिली आहे. पाणबुडीच्या बांधकामा दरम्यान "यार्ड 11878" म्हणून नियुक्त केलेली, आयएनएस वेला (INS Vela) ही चौथी स्कॉर्पीन- श्रेणी पाणबुडी आहे. जी एमडीएलने फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधली आहे. असख्य भारतीय कंपण्याचे प्लटफॉर्म तयार करण्यात आलेले सहकार्य हे 'मेक इन इंडिया' (Make In India) संकल्पनेचे खरे प्रतिनिधित्व करते, अशी माहिती नौदलाने (Navy) दिली आहे.

या बांधकामाला जुलै 2009 मध्ये सुरुवात झाली. मे 2019मध्ये पाणबुडीला INS वेला असे नाव देण्यात अळे आणि व्यापक यंत्रणा, यंत्रसामग्री आणि शस्त्राच्या चाचण्यानंतर , या महिन्यात एमडीएलने भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले.नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी एका समारंभात पाणबुडीचा नौदलामध्ये समावेश केला. त्यांनी या पाणबुडीला नौदलाचे चिन्ह आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार दिला. एवढेच नव्हे तर भारताची कायदेशीर आणि सार्वभौम प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली, असे नौदलाने निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com