Indian Navy Jobs: नौदलात 20 हजार पदांच्या भरती; असं डाउनलोड करा Admit Card

Indian Navy
Indian Navy

भारतीय नौदलाने आर्टिफायर अ‍ॅप्रेंटिस (AA) आणि सीनियर सेकेंडरी भर्ती (SSR) अंतर्गत नाविक पदासाठी लेखी परीक्षा आणि पीईटीचे प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. या भरती परीक्षेस भाग घेणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या वेबसाइटवरून आपले कॉल लेटर डाउनलोड करू शकतात. Indian Navy AA/SSR Aug 2021 बॅच अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज डॅशबोर्डवर लॉग इन करणे आवश्यक आहे. इंडियन नेव्ही अ‍ॅडमिट कार्डची लिंक खाली दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात.(Indian Navy Jobs Download Admit Card)

असे करा अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड 

1 भारतीय नौदलाच्या अधिकृत joinindiannavy.gov.in संकेतस्थळावर भेट द्या.
2 होम पेजवर 'उमेदवार लॉगिन' या टॅबवर क्लिक करा.
येथे Correspondence State आणि कॅप्चा कोड अ‍ॅड करा.
4 आता आवश्यक माहिती मागितल्याप्रमाणे भरा.
5 भारतीय नौदल एए एसएसआर प्रवेश पत्र 2021 आल्याला दिसणार.
6 ते डाउनलोड करा आणि एक प्रिंट आउट काढा.

भारतीय नौदल वॅकन्सी 2021 

ऑगस्ट 2021 बॅचमध्ये एकूण 2500 रिक्त जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी 2000 एसएसआर आणि 500 ​​एएसाठी आहेत. नौदल प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज- एए -150 आणि एसएसआर -02 / 2021 बॅच 26 एप्रिल 2021 ते 05 मे 2021 या कालावधीत मागवण्यात आले होते.

इंडियन नेव्ही फिजिकल फिटनेस टेस्ट

लेखी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना त्याच दिवशी फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) मध्ये उपस्थित रहावे लागेल.
उंची: 157 सेमी
रनिंग: 1.6 किमी 07 मिनिटांत पूर्ण.
स्क्वॅटअप्स: 20 वेळा 
पुशअप्स: 10 वेळा

परीक्षेची तारीख आणि मेरीट लिस्ट
भारतीय नौदलाच्या SSR/AA भरतीसाठी लेखी आणि शारीरिक फिटनेस चाचणी जून किंवा जुलै 2021 मध्ये घेतली जाईल. तर 23 जुलै 2021 रोजी गुणवत्ता यादी वेबसाइटवर अपलोड केली जाईल. ए.ए. अखिल भारतीय योग्यता क्रमवारीमध्ये 600 उमेदवार गुणवत्ता व एसएसआर च्या क्रमानुसार आणि 2500 उमेदवारांना राज्य निहाय गुणवत्तेच्या आधारे आयएनएस चिल्का मध्ये अंतिम नामांकन वैद्यकीय परीक्षेसाठी कॉल-अप पत्र दिले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com