चीन-पाकिस्तानला आता समुद्रातही टक्कर, भारतीय नौदल सज्ज

नौदल आता देशातील सशस्त्र दलांसाठी म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या पंधरा वर्षांच्या एकात्मिक त्रि-सेवा क्षमता विकास योजनेवर काम करत आहे.
Indian Navy ready to launch ne plan  against China & Pakistan
Indian Navy ready to launch ne plan against China & Pakistan Dainik Gomantak

चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) भारताविरुद्ध समुद्रात एकत्र कट रचण्याची तयारी करत असतील, पण भारतीय नौदल (Indian Navy) पारंपारिक युद्धापासून आण्विक युद्धापर्यंत सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय नौदलाचे सहप्रमुख व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे. (Indian Navy ready to launch ne plan against China & Pakistan)

भारतीय नौदलाचे उपप्रमुख एस.एन. घोरमाडे मंगळवारी राजधानी दिल्लीत देशातील लवकरच स्वदेशी बनावटीची युद्धनौका, आयएनएस विशाखापट्टणम आणि पाणबुडी, आयएनएस वेला याविषयी सविस्तर माहिती देत होते. त्याचवेळी, चीनने अलीकडेच पाकिस्तानला एक मोठी युद्धनौका दिली आहे आणि (08) पाणबुडी करारावरही स्वाक्षरी केली आहे त्याचं काय या प्रश्नावर उत्तर देताना एसएन घोरमाडे म्हणाले की भारतीय नौदल अशा धोक्यांना आधीच सतर्क आहे आणि त्यासाठीच सैन्याने यासाठी 'सागरी क्षमता संभाव्य आराखडा' तयार करण्यात आला आहे.आणि या योजनेचा आढावा देखील दार पाच वर्षांनी घेतला जात असतो असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

यादरम्यान, त्यांनी सांगितले की दीर्घकालीन 'युद्धाच्या स्पेक्ट्रम'साठी एखाद्याच्या क्षमता विकसित करणे ही योजना असल्याचे सांगतच यात 'कमी घनता ते आण्विक युद्ध' साठी तयार राहणे आवश्यक आहेअसे स्पष्ट मत देखील त्यांनी मांडले आहे.

Indian Navy ready to launch ne plan  against China & Pakistan
भारतीय नौदालाची ताकद वाढणार, 'INS Vela' ताफ्यात सामील

व्हाईस अॅडमिरल घोरमाडे यांनी सांगितले की, नौदल आता देशातील सशस्त्र दलांसाठी म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या पंधरा वर्षांच्या एकात्मिक त्रि-सेवा क्षमता विकास योजनेवर काम करत आहे. देशाच्या विकास दराव्यतिरिक्त, या योजनेत संरक्षण बजेट आणि शस्त्रास्त्रांची किंमत समाविष्ट आहे. सह-नौदल प्रमुखांच्या मते, या योजनेत नौदलासाठी तिसरे विमान आणि पाणबुड्यांचाही समावेश आहे. याशिवाय नौदलात ड्रोन समाविष्ट करण्याचाही समावेश या योजनेत असणार आहे.

दरम्यान नौदल दिनापूर्वी भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात मोठी वाढ होणार आहे. स्वदेशी स्टेल्थ मिसाईल डिस्ट्रॉयर जहाज आणि INS विशाखापट्टणम या महिन्याच्या 21 तारखेला भारतीय नौदलात सामील होणार आहे. चार दिवसांनंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी स्कॉर्पीन वर्गाची चौथी पाणबुडी, आयएनएस वेला देखील देशाची सागरी शक्ती वाढवण्यासाठी सामील होत आहे. याशिवाय संध्याक नावाचे सर्वेक्षण जहाजही लवकरच समुद्रात दाखल केले जाईल आणि पुढील वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2022 पर्यंत नौदलात सामील केले जाणार आहे.

आणि आता त्यामुळेच भारतीय नौदल चीन आणि पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यसाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com