भारतीय नौदालाची ताकद वाढणार, 'INS Vela' ताफ्यात सामील

1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) विजयात निर्णायक भूमिका बजावल्याबद्दल नौदलाचा (Navy)स्थापना दिवस साजरा केला जातो.
INS वेला
INS वेला Dainik Gomantak

भारतीय नौदलाच्या स्थापना दिनापूर्वी नौदलाची (Navy) ताकद वाढणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी, चौथी कलवरी-श्रेणी पाणबुडी वेला 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत कार्यान्वित सेवेत दाखल होईल. त्याच वेळी, याच्या चार दिवस आधी म्हणजेच 21 तारखेला स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र नाशक INS विशाखापट्टणम (Visakhapatnam) नौदलाच्या मोठ्या ताफ्यात सामील होणार आहे.

21 नोव्हेंबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS विशाखापट्टणमला नौदलाच्या ताफ्यात सामील करतील. त्यासाठी मुंबई डॉकयार्ड (Mumbai Dockyard) येथे कमिशनिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचवेळी नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग मुंबईत होणाऱ्या समारंभात INS नौदलात सामील करणार आहेत. MDL ने फ्रान्सच्या मदतीसाठी ही तयारी केली आहे. आयएनएस कलवरी, खांदेरी आणि करंज या वर्गाच्या आणखी तीन पाणबुड्या यापूर्वीच नौदलात सामील झाल्या आहेत.

INS वेला
भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडची धुरा नव्या प्रमुखांकडे

INS विशाखापट्टणमबद्दल बोलायचे झाले तर INS विशाखापट्टणम युद्धनौकेची एकूण लांबी 535 फूट आहे. ट्रेनच्या डब्याची लांबी 77 फूट आहे यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. अशा परिस्थितीत या युद्धनौकेची लांबी रेल्वेच्या 7 डब्यांच्या लांबीइतकी आहे. हे Twin Zorya M36E गॅस टर्बाइन प्लांट, बर्गन KVM डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. ते समुद्रात उच्च वेगाने फिरण्यास सक्षम आहे.

4 डिसेंबर रोजी नौदलाच्या स्थापना दिनापूर्वी INS वेला नौदलात सामील होणार आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्धच्या विजयात निर्णायक भूमिका बजावल्याबद्दल नौदलाचा स्थापना दिवस साजरा केला जातो.

भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग 30 नोव्हेंबर रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने (Central Government) व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. हरी कुमार सध्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ आहेत आणि ते 30 नोव्हेंबर रोजी त्यांचे नवीन पद स्वीकारतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com