Indian Navy करणार कारवार ते नवी दिल्लीपर्यंत मोटरसायकल प्रवास

Indian Navy ही मोहिम कारवार ते नवी दिल्लीपर्यंत 6000 किलो मीटर अंतर पार करेल
Indian Navy करणार कारवार ते नवी दिल्लीपर्यंत मोटरसायकल प्रवास
Indian NavyDainik Gomantak

दाबोळी: भारतीय नौदलातर्फे (Indian Navy) कारवार ते नवी दिल्लीपर्यंत (Karwar to New Delhi) मोटरसायकल प्रवास मोहिम (Motorcycle expedition) हाती घेण्यात आली आहे. स्वर्णीम विजय अभियान अशा शिर्षकाखाली स्वर्णीय विजय वर्ष व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ही मोहिम असून योगायोगाने याच क्षणी नौदलाला प्रेसिडेन्ट कलर सन्मान प्राप्त झालेला आहे.

Indian Navy
Indian NavyDainik Gomantak

सोमवारी कारवार येथील सी बर्ड तळावरून या मोहिमेला प्रारंभ केला. येत्या दि. 3 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम चालणार आहे. 50 पेक्षा जास्त नौदल कर्मचारी अकरा मोटरसायकल व दोन सपोर्ट वाहनांसह या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ही मोहिम कारवार ते नवी दिल्लीपर्यंत 6000 किलो मीटर अंतर पार करेल.

Indian Navy
Indian Navy: नौदल एव्हिएशनला अतुलनीय कामगिरीसाठी राष्ट्रपतींनी दिला सर्वोच्च सन्मान
Indian Navy
Indian NavyDainik Gomantak

या मोटरसायकल मोटरसायकल राईडर्स नॅशनल डिफेन्स अकादमी, सातारा येथील सैनिक स्कूल, बालाचडी, कापुरथाला व कुंजपुरा व राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, चैल येथील कॅडेटस व कर्मचाऱ्यांशीसंवाद साधतील. तसेच लोणावळा येथील नौदल विभाग, पोरबंदर व जामनगर येथील भारतीय लष्कर व इंडियन एअर फोर्सच्या आस्थापनाना भेटी देतील.सोमवारी नौदल जहाज दुरूस्ती यार्डचे रिअर अॅडमिरल डी. के. गोस्वामी यांनी आयएनएस विक्रमादित्य येथून या मोहिमेला बावटा दाखविला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com