India: पाकिस्तानला भरणार धडकी, सीमेजवळ भारताची मोठी योजना

Prime Minister Narendra Modi: नवीन लष्करी विमानतळ उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात तयार होत आहे.
 Air Force
Air ForceDainik Gomantak

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात गुजरातमधील पाकिस्तान सीमेजवळील 'डीसा' येथे लष्करी विमानतळाची पायाभरणी केली, जे देशाच्या हवाई सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. नवीन लष्करी विमानतळ उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात तयार होत आहे. जो पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हवाई दलासाठी पूर्णपणे तयार होईल.

दरम्यान, या लष्करी विमानतळाची (Airport) पायाभरणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देशाच्या संरक्षणासाठी हे एक प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल.'

 Air Force
Rajnath Singh: युक्रेनच्या डर्टी बॉम्बने वाढवले रशियाचे टेन्शन; भारताच्या संरक्षण मंत्र्यांशी केली चर्चा

ते पुढे म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय सीमा (Pakistan) येथून फक्त 130 किमी अंतरावर आहे. जर आमचे सैन्य, विशेषत: हवाई दल डीसामध्ये उपस्थित असेल, तर आम्ही पश्चिम सीमेवरील कोणत्याही आव्हानाला अधिक प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ शकू."

 Air Force
Rajnath Singh: डर्टी बॉम्बच्या धोक्यानंतर भारताने व्यक्त केली चिंता

दुसरीकडे, संरक्षण विश्लेषक राहुल बेदी पुढे म्हणतात की, "हा तळ एक संरक्षणात्मक तयारी म्हणून तयार केला जात आहे. दुसरे म्हणजे, पंतप्रधान मोदी भारताची (India) 'फॉरवर्ड पॉलिसी' पुढे नेत आहेत. ते आक्रमक धोरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. डीसामधील लष्करी तळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे विमानतळ 4519 एकरवर बांधले जात आहे. ही जमीन पूर्वीपासूनच हवाई दलाकडे (Air Force) होती. सध्या तिथे 20 टेहळणी टॉवर बांधण्यात आले आहेत. तर या भूखंडाभोवती 22 किमी लांबीची भिंतही बांधण्यात आली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com