गोवा पर्यटकांसाठी खुशखबर! IRCTC ने दिले “EXOTIC GOA” टूर पॅकेज

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) “EXOTIC GOA“ टूर ऑफर करत आहे. गोवा हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

मुंबई: आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) “EXOTIC GOA“ टूर ऑफर करत आहे. गोवा हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या टूर पॅकेजमध्ये पुरातन पोर्तुगीज कॉलनी, स्मारके, जंगल, वालुकामय किनारे आणि डिलाइटफुल क्यूसिन अशा बर्‍याचशा ठिकाणांचा समावेश आहे. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजच्या माध्यमातून गोव्यातील सर्वात स्वस्त आणि सर्वात आकर्षक ठिकाणांना भेट देणार आहे.

भारतात सर्वात प्रथम पोर्तूगीजच आले होते. तो 1510 चा कालावधी होता.  विजापूरच्या सुलतान युसुफ आदिल शाहचा पराभव केल्यानंतर पोर्तुगीजांनी वेल्हा गोवा (जुना गोवा) ताब्यात घेतला आणि तिथे कायमची वसाहत बनविली.

गोवा देशभरात खूप प्रसिद्ध आहे. तेथील काही बीच लोकांने खूप लोकप्रिय आहे. समुद्रकिनार्यावर बसून सूर्यास्त बघणारे रसिक आहेत.  ख्रिसमस आणि न्यु इयर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.  पर्यटनासाठी हा सिझन सर्वाधिक पसंत केला जातो. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा जल्लोश मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने इथे बहुतेक पर्यटकांची डिसेंबर महिन्यात जास्त गर्दी दिसते. म्हणून या हंगामात गोव्याला जाणे चांगले आहे.  तुम्हाला सीफूड आवडत असेल तर आपणास इथे उत्तम सीफूड देखील मिळू शकते.

पॅकेज तपशील

 • 1) पॅकेजचे नाव – एक्सोटिक गोवा (Exotic Goa)
 • २) प्रवास – फलाइट
 • 3) किती दिवस - 3 रात्री आणि 4 दिवस
 • 4) क्लास – कंफर्ट
 • 5) तारीख - 18.02.2021 ते 21.02.2021
 • 6) जेवण योजना - नाश्ता आणि रात्रीचे जेवण
 • 7) स्थान – मुंबई

पॅकेज खर्च – सोई कॅटेगीरी

 • 1) अडल्ट ऑन सिंगल ऑक्यूपेंसी – 24300 रुपये
 • 2) अडल्ट ऑन डबल ऑक्यूपेंसी – 18100 रुपये
 • 3) अडल्ट ऑन ट्रिपल ऑक्यूपेंसी- 17600 रुपये
 • 4) चाइल्ड विथ बेड ( 2 ते 11 वय) – 14200 रुपये
 • 5) चाइल्ड विथआउट बेड (2 ते 11 वय) – 12900 रुपये

 

संबंधित बातम्या