कृपया लक्ष द्या! भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नविन हेल्प लाइन नंबर जारी केला आहे...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

प्रवाशांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. आता रेल्वेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली: प्रवाशांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. आता रेल्वेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची चिंता करण्याची गरज नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने रेल्वे हेल्पलाईन क्रमांकांना एकत्रित केले आहे. भारतीय रेल्वेने आता अस्तित्त्वात असलेल्या सर्व हेल्पलाइन क्रमांकाच्या जागी 139 नंबर जारी केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना हा रेल्वे क्रमांक लक्षात ठेवणे सोपे होईल.

ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी गुगल करणार मदत 

प्रवासादरम्यान सर्व चौकशी आणि तक्रारी नोंदविण्यासाठी  139 या क्रमांकाचा वापर केला जाईल. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 139 च्या व्यतिरिक्त विभागीय रेल्वे नवीन हेल्पलाईन क्रमांक किंवा तक्रार क्रमांक देणार नाही.  हाच नवीन नंबर रेल्वे वापरकर्त्यांसाठी एकात्मिक सेवा प्रदान करेल. प्रवासी सुरक्षा, तक्रारी, खानपान आणि दक्षतेसाठी 139 डायल करू शकतात. नवीन हेल्प लाइन नंबर सुरू होताच इतर सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद केले जाणार आहे.

भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही 

139 हा हेल्प लाइन नंबर 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि तो आयव्हीआरएस (इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) वर आधारित असेल. सर्व मोबाईल फोन वापरणारे 139 वर कॉल करू शकतात. या क्रमांकावर, प्रवाशांना रेल्वे आणि आरक्षणाशी संबंधित मूलभूत चौकशीसाठी पीएनआर स्थिती, तिकिट (सामान्य आणि तात्काळ) उपलब्धता, रेल्वे आगमन, प्रस्थान, यासारख्या मूलभूत चौकशीसाठी एसएमएस पाठवून माहिती मिळू शकणार आहे.

संबंधित बातम्या