होळी ला घरी जायचंय? मग आजच बुक करा भारतीय रेल्वेच्या या होळी स्पेशल ट्रेनचं तिकीट

Indian Railways launches Holi special train
Indian Railways launches Holi special train

नवी दिल्ली: जर तुम्ही होळीसाठी ट्रेनने घरी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. होळीचा सण जवळ आला आहे आणि लोकं कामावरुन आपल्या घरी निघणार आहेत. परंतु सध्या सर्व रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे भारतीय रेल्वेकडून चालवल्या जात नाहीत. तेव्हा विशेष गाड्यांच्या मदतीने आपण आपल्या घरी जाऊ शकाल. लोकांना घरी जायला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने होळी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. होळी 28 आणि 29 मार्च रोजी आहे, अशा परिस्थितीत या गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधी वाढवल्याने लोकांना त्याचा फायदा होणार आहे.

रेल्वेने काही साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचीही घोषणा केली आहे. या गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवरून करता येणार आहे. याशिवाय डिब्रूगड राजधानी एक्सप्रेस आता आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. ही ट्रेन दिब्रूगड येथून धावेल आणि मुगलसराय पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज आणि कानपूरमार्गे नवी दिल्ली येथे पोहोचेल. ही ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून सकाळी 11.25 वाजता सुटणार आहे. पूर्वी ही ट्रेन मंगळवारी फक्त दिल्लीहून येत होती. आता दिब्रुगडहून ही ट्रेन दर रविवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.

होळी निमित्त स्पेशल ट्रेन ची लिस्ट-


  • 2335 भागलपुर-लोकमान्य तिलक टर्मिनल स्पेशल ट्रेन0


  •  02336 लोकमान्य तिलक टर्मिनल-भागलपुर स्पेशल ट्रेन


  •  02361 आसनसोल-सीएसटी मुंबई स्पेशल ट्रेन


  •  02362 CST मुंबई-आसनसोल स्पेशल ट्रेन


  •  03512 आसनसोल-आतनगर स्पेशल ट्रेन


  •  03511 टाटानगर-आसनसोल स्पेशल ट्रेन


  •  03509 आसनसोल-गोंडा स्पेशल ट्रेन


  •  03507 आसनसोल-गोरखपुर स्पेशल ट्रेन


  • 03508 गोरखपुर-आसनसोल स्पेशल ट्रेन


  •  03402 दानापुर-भागलपुर स्पेशल ट्रेन


  •  03419 भागलपुर-मुजफ्फरपुर स्पेशल ट्रेन


  •  03420 मुजफ्फरपुर-भागलपुर स्पेशल ट्रेन


  •  03023 हावड़ा-गया स्पेशल वाया साहिबगंज ट्रेन


  •  03024 गया-हावड़ा स्पेशल वाया साहिबगंज ट्रेन


  •  02315 कोलकाता-उदयपुर सिटी स्पेशल ट्रेन

  •  02316 उदयपुर सिटी-कोलकाता


  • 03002 सिउड़ीवाड़ा स्पेशल ट्रेन

  •  03506 आसनसोल-दीघा स्पेशल ट्रेन

  •  03505 दीघा-आसनसोल स्पेशल ट्रेन

  •  03418 मालदा टाउन-दीघा स्पेशल ट्रेन

  •  03417 दीघा-मालदा टाउन स्पेशल ट्रेन

  •  03425 मालदा टाउन-सुंदर स्पेशल ट्रेन

  •  03415 मालदा टाउन-पटना स्पेशल ट्रेन

  •  03416 पटना-मालदा टाउन स्पेशल ट्रेन

  •  03165 कोलकाता-सीतामढ़ी स्पेशल ट्रेन

  •  03166 सीतामढ़ी-खोलकट स्पेशल ट्रेन

  •  03502 आसनसोल-हल्दिया स्पेशल ट्रेन
  •  03501 हल्दिया-आसनसोल स्पेशल ट्रेन

या वर्षी 29 मार्च 2021 ला  होळी आणि 28 मार्च म्हणजे रविवारी होलिका दहन (Holika Dahan) साजरा करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com