भारतीय रेल्वेने 25 मे 2020 पर्यंत संपूर्ण देशभरात 3274 “श्रमिक विशेष” गाड्या चालविल्या

Pib
बुधवार, 27 मे 2020

आज धावणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी आढळून आली नाही.

 मुंबई ,

देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जाता यावे याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने 1 मे 2020 पासून श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वेने 25 मे 2020 पर्यंत संपूर्ण देशभरात 3274 “श्रमिक विशेष” गाड्या चालविल्या आहेत. या श्रमिक गाड्यांमधून 44 लाखांहून अधिक प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले आहेत. 25 मे 2020 रोजी 223 श्रमिक विशेष गाड्यांमधून 2.8 लाख प्रवाशांना नेण्यात आले.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना 74 लाखांहून अधिक मोफत जेवण आणि 1 कोटींहून अधिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले आहे.

आज धावणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी आढळून आली नाही.

श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेकडून दिल्लीहून 15 जोड्या विशेष गाड्या सोडल्या जात आहेत आणि 1 जून पासून अजून 200 गाड्या सुरु करण्याची योजना आहे.

संबंधित बातम्या