भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरु केली केटरिंग सेवा

आधीच बूकिंग केलेल्या टिकीटांसाठी, IRCTC त्यांच्या वेबसाइटवर केटरिंग सेवा निवण्यासाठी आणि देय शुल्क आगाऊ भरण्यासाठी सुविधा प्रदान करेल.
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरु केली केटरिंग सेवा
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरु केली केटरिंग सेवाDainik Gomantak

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन (IRCTC) ने राजधानी(Rajdhani), शताब्दी(Shatabdi) , दुरंतो (Duronto), वंदे भारत(Vande Bharat) , तेजस(Tejas) आणि गतिमान एक्स्प्रेस (Gatiman Express Train) गाड्यांमध्ये ताजे शिजवलेले अन्न देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व संबंधित विभाग आणि भागधारकांना या संदर्भात आदेश जारी केला आहे.

सध्या ते फक्त राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस आणि गतिमान एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना लागू असेल. ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट बूक केले आहे, त्यांच्यासाठी सेवा पुरवठादाराला काही सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशानुसार, आगाऊ आरक्षण कालावधीत येणाऱ्या प्रवाशांसाठी विशिष्ट ट्रेनमध्ये शिजवलेल्या जेवणासह ऑनबॉर्ड केटरिंग सेवा कोणत्या तारखेपासून सुरू केली जातील यांची माहिती IRCTC संबंधित विभागीय रेल्वेला देईल.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरु केली केटरिंग सेवा
अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगता येणार ? मोदी सरकार आणणार विधेयक

* प्रवाशांना एसएमएस/इ-मेलद्वारे माहिती मिळेल

* याशिवाय, झोन अधिकाऱ्यांनी इ-तिकीट प्रवाशांना, ज्यांनी आधीच एसएमएस आणि इ-मेलद्वारे तिकीट बूक केले आहे, त्यांना शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबत सूचित करणे आवश्यक आहे.

* आधीच बूक केलेल्या टिकीटांसाठी, IRCTCत्यांच्या वेबसाइटवर केटरिंग सेवा निवडण्यासाठी आणि देय शुल्क आगाऊ भरण्यासाठी सुविधा प्रदान करेल. ही सुविधा इ-तिकीट तसेच काउटर तिकीट प्रवाशासाठी उपलब्ध असेल.

* ज्या प्रवाशांनी आधीच ऑनलाइन बुकिंग केले आहे आणि ते निवडले नाही झाली तर त्यांना मागणीनुसार शिजवलेले जेवण पेमेंटच्या आधारावर ट्रेनमध्ये प्रदान केले जावे. ऑनबोर्ड तिकीट तपासणी कर्मचारी मंजूर दर यादीनुसार केटरिंग शुल्क आकारतील.

* अलीकडेच, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील विमान कंपन्याना सर्व देशांतर्गत उड्डाणामध्ये खाद्यपदार्थ देण्याची परवानगी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com