भारताच्या राफेलचा चीनने घेतला धसका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

बंगळुरुमध्ये 2021एअर इंडिया शो आणि चीन सह वास्तविक सीमारेषेवर (एलएसी) चालू असलेल्या तणावाच्या दरम्यान हवाई दलाच्या प्रमुखांनी सुरक्षा दल सीमेवर तैनात केले असल्याचे गुरुवारी सांगितले.

बंगळुरु: बंगळुरुमध्ये 2021एअर इंडिया शो आणि चीन सह वास्तविक सीमारेषेवर (एलएसी) चालू असलेल्या तणावाच्या दरम्यान हवाई दलाच्या प्रमुखांनी सुरक्षा दल सीमेवर तैनात केले असल्याचे गुरुवारी सांगितले. एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया म्हणाले की, राफेल विमानाने चीनची चिंता वाढवली आहे. हवाई दलाचे प्रमुख मार्शल आरकेएस भदौरिया म्हणाले की, चीनने आपले जे -20 लढाऊ विमान पूर्व लडाख जवळील भागात तैनात केले होते, परंतु जेव्हा आम्ही त्या भागात राफेल तैनात केले तेव्हा ते मागे झाले.

हवाई दलाचे आरकेएस भदौरिया म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीवर भारत आणि चीन दरम्यान चर्चा सुरू आहे. ही सर्व चर्चा कशाप्रकारे होते यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहे. आम्ही आवश्यक तेवढे सीमा सुरक्षा दल तैनात केले आहे. होणाऱ्या चर्चेवर आमचे लक्ष आहे. जर त्यांनी माघार घेण्यास सुरूवात केली तर ते चांगले आणि जर यातून एखादी नवीन परिस्थिती उद्भवली तर आपण त्यासाठीही पूर्णपणे तयार आहोत, आसे ते म्हणाले. हवाई दलाच्या प्रमुखांना जेव्हा राफेल विमानामुळे चीनची चिंता वाढली आहे का असे विचारले असता भदोरिया म्हणाले की ते नक्कीच चीन या राफेलमुळे अस्वस्थ झाले आहे. पूर्वेकडील लडाखच्या जवलच्या भागात चीनने आपले जे -20 लढाऊ विमान आणले, परंतु जेव्हा आम्ही राफेलला त्या प्रदेशात आणले, तेव्हा ते माघारी गेले. आम्ही चीनची कार्यक्षमता जाणून आहोत.

Farmer protest: गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आक्रमक -

एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया म्हणाले की भांडवली खर्चामध्ये 20,000 कोटी रुपयांची वाढ ही सरकारची एक मोठी पायरी आहे. मागील वर्षीही 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला होता. यामुळे तिन्ही सैन्यांच्या तीन्ही दलाला मदत झाली. मला वाटते की आपण आपली क्षमता वाढविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत  आहोत.

 

संबंधित बातम्या