समुद्रात 1600 किमीवर अडकलेल्या मच्छिमारांची सुटका

भारतीय खलाशांची अडकलेली बोट प्रसंगावधानामुळे सुरक्षित
समुद्रात 1600 किमीवर अडकलेल्या मच्छिमारांची सुटका
Fishermen releasedDainik Gomantak

कोची पासून सुमारे 1600 किलोमीटरवर 15 भारतीय खलाशी असणारी मासेमारीसाठी गेलेली बोट अडकलेल्याची माहीती मिळाली होती. यानंतर घटनेच गांभिर्य ओळखत सागरी बचाव समन्वय केंद्र मुंबई यांनी तातडीने समुद्रात सापडलेल्या मच्छीमारांच्या मदतीसाठी आंतराष्ट्रीय सुरक्षा जाळे सक्रिय करुन बोटमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना मदत पोहोचवत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. (Indian sailors' stuck boat safe)

Fishermen released
'तलाक-ए-हसन'ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय मुख्य भूमी कोची पासून सुमारे 1600 किलोमीटर अंतरावर मच्छीमारांची बोट अडकली होती. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आणि समुद्रातील संकटात सापडलेल्या मच्छीमारांना मदत पुरवण्यासाठी सागरी बचाव समन्वय केंद्र मुंबई यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळे सक्रिय करत संकटात सापडलेल्या मच्छीमारांच्या मदतीसाठी योग्य ती पावले उचलली.

Fishermen released
कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? अमित शहांच्या दौऱ्यावरुन चर्चांना आलं उधान

यासाठी अडकलेल्या जहाजानजिक असलेल्या मारिया नावाच्या जहाजाला मदत पुरवण्यासाठी त्वरित पाठवले. व अडकलेल्या जहाजाला दुरुस्त करत संकटात सापडलेल्या मच्छिमारांना कमीत कमी वेळेत मदत केली आणि या प्रकरणात संकटात सापडलेल्यांना तात्काळ दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.