जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय जवानांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियां सेक्टरमध्ये सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसामग्री यावेळी जप्त कऱण्यात आली. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करून सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम राबविली जात आहे.भारतीय सुरक्षा दलांना काही दहशतवादी शोपियांमधील एका घरात लपून बसले आहेत,  कोणतातरी दहशतवादी हल्ला कऱण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.

महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलिसांसह एक पथक तयार करून त्या भागात शोध मोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना शरण जाण्यास सांगितले पण दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.गोळीबाराच्या आवाजावरून असा अंदाज लावला जात होता की घराच्या आत तीन ते चार दहशतवादी लपले असतील.कित्येक तास दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारानंतर अखेर तीन दहशतवादी ठार झाले. 

या मार्गांवर धावणार 6 विशेष रेल्वे गाड्या; भारतीय रेल्वेचा निर्णय

बीरवा येथे सुरू असलेल्या चकमकीत  एक पोलिस शहीद 

जम्मू आणि काश्मीरच्या बिरगाममधील बिरवा येथे झालेल्या चकमकीदरम्यान राज्य पोलिसांचे एसपीओ मोहम्मद अल्ताफ शहीद झाले. त्याचवेळी दुसरे सुरक्षा कर्मचारी मंजूर अहमद जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे बडगामच्या बिरवा भागात चकमकीस सुरूवात झाली. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की पोलिस व सुरक्षा दलाची घटनास्थळी सध्या उपस्थित आहे

संबंधित बातम्या